ना. प्राजक्त तनपुरेंच्या प्रयत्नातून राहुरीला निधी-साळवे

ना. प्राजक्त तनपुरेंच्या प्रयत्नातून राहुरीला निधी-साळवे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध असून राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील जनतेने मोठ्या विश्वासाने ना. प्राजक्त तनपुरे यांना

विधानसभेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठविले. नामदार तनपुरे यांच्या प्रयत्नातून नगरपरिषदेसाठी अनेक विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्याचे काम होत आहे व यापुढेही होत राहील, असा विश्वास राहुरी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ. राधाताई साळवे यांनी व्यक्त केला.

शहरातील 16 लक्ष रुपये किंमतीच्या अंतर्गत पाईप गटारीच्या कामाचा शुभारंभ त्यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मतदारसंघातील इतर कामांमुळे ना. तनपुरे यांच्यावरील जबाबदारी वाढलेली आहे. त्यांचे पाठबळ व ज्येष्ठनेते माजी खासदार प्रसाद तनपुरे, अरुण तनपुरे, डॉ. सौ. उषाताई तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर विकासाची घोडदौड सुरूच राहील.

अजूनही शासनाकडून विविध विकास कामांसाठी निधी मंजूर असून लवकरच ही कामे सुरू होऊन राहुरी शहर स्मार्ट सिटीकडे नेण्याचा संकल्प सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. क्रांतिचौक येथे विविध विकास कामांचा शुभारंभ प्रातिनिधिक स्वरूपात सौ. साळवे यांच्या हस्ते पूजा करून सुरू करण्यात आला.

यावेळी माजी नगराध्यक्ष अनिल कासार, नगरसेवक मुजफ्फर कादरी, नंदकुमार तनपुरे, बाळासाहेब उंडे, सूर्यकांत भुजाडी, दीपक साळवे, संजय साळवे, मुख्याधिकारी श्रीनिवास कुरे, बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com