लग्न समारंभातून करोनाचा अधिक फैलाव : ना. तनपुरे
सार्वमत

लग्न समारंभातून करोनाचा अधिक फैलाव : ना. तनपुरे

Arvind Arkhade

पाथर्डी|तालुका प्रतिनिधी|Pathardi

राज्यात लॉकडाऊन शिथिलतेनंतर अनलॉकची घोषणा झाली. त्यांनतर मोजक्या लोकांकरिता अटी शर्तीसह लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली. मात्र तसे न होता लग्नात गर्दी बघायला मिळत आहे. अशा गर्दीतूनच करोनाचा फैलाव झालाचे मत मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

तनपुरे यांच्या उपस्थितीत पाथर्डी तालुक्यात करोनाची वाढती रुग्ण संख्या पाहता अधिकारी व पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील, उपविभागीय पोलीस प्रांतधिकारी मंदार जवळे, गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे, तालुका आरोग्यधिकारी डॉ. भगवान दराडे, मुख्यधिकारी धनंजय कोळेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ आव्हाड प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महसूल, आरोग्य, पोलीस विभागांना वाढत्या करोना रुग्णाच्या उपाययोजनेबाबत योग्य त्या सूचना यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या.

Deshdoot
www.deshdoot.com