मंत्री शंकरराव गडाखांच्या गळनिंब परिसरात घोंगडी बैठका

मंत्री शंकरराव गडाखांच्या गळनिंब परिसरात घोंगडी बैठका

नेवासा | तालुका प्रतिनिधी

राज्याचे जलसंधारण नामदार शंकरराव गडाख यांनी तालुक्यातील गळनिंबसह खेडले काजळी , मंगळापूर येथे जाऊन ग्रामस्थांसोबत घोंगडी बैठका घेत पीक,पाणी,वीज विविध प्रश्नांवर चर्चा करत प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. गावा गावात नामदार गडाख यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. मंत्री होऊनही गडाख हे साधेपणा जपत असल्याबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले .

यावेळी ना.गडाख यांनी जायकवाडी धरणाची पाणी पातळी, गोदावरी नदीपात्रातील पाणी विसर्गाची माहिती, ऊस, कपाशी, कांदा, सोयाबीन या पिकांची सद्य स्थिती मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने रब्बी पिकांसाठी वीज पुरवठा पूर्ण क्षमतेने व्हावा यासाठी पूर्णपणे सहकार्य केले जाईल शेतकरी बांधवानी सुयोग्य व्यवस्थापन करून पिकांचे नियोजन करावे तसेच नागरिकांनी कोविड लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण करून घ्यावे असे आवाहन ना गडाख यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना केले.

उपस्थित नागरिकांच्या समस्या संबधित अधिकाऱ्यांना थेट जागेवरच फोन करत ना गडाख यांनी सोडवल्या याप्रसंगी जी प सदस्य दादासाहेब (पिंटूशेठ) शेळके, जनार्धन शेळके, हरिभाऊ शेळके, निलेश शेळके, बाबुराव हिवाळे, रमेश शेळके, साहेबराव शिंदे, पोपटराव गव्हाणे, आण्णा नरोडे, आप्पासाहेब शिंदे, प्रल्हाद शिंदे, काकासाहेब भगत, बाळासाहेब कोरडे, रायभान कोरडे, पोपटराव मुठे, संजय चव्हाण, हनुमान उदे, दादासाहेब कोरडे आदींसह गळनिंब, खेडलेकाजळी, मंगळापूर या गावातील तरुण, जेष्ठ विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com