ना.गडाखांच्या कर्जत, जामखेडला शिवसंवाद घोंगडी बैठका

ना.गडाखांच्या कर्जत, जामखेडला शिवसंवाद घोंगडी बैठका

अहमदनगर (प्रतिनिधी)

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी जामखेड तालुक्यात बावी, जवळा तसेच कर्जत तालुक्यातील निमगाव डाकू, मौजे शिंदा, कोंभळी या गावांमध्ये तालुक्यातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या शिवसंवाद घोंगडी बैठका घेतल्या.

यावेळी संवाद साधतांना ना. गडाख म्हणाले, की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. घरा घरात शिवसैनिकांची नोंदणी करून पक्षाचे ध्येय धोरणे आपल्याला गावा गावात, वाड्या वस्त्यांवर पोहचवायचे आहेत त्यासाठी आपण सर्व मिळून काम करू शिवसैनिकांचे,नागरिकांचे जे विविध प्रश्न असतील ते सोडविण्यासाठी प्रयत्न करू. मा उद्धवजी ठाकरे यांनी मला शिवसेनेच्या माध्यमातून मंत्री करून नगर जिल्ह्यातील शिवसेनेचा प्रतिनिधी म्हणून काम करण्याची संधी दिली निश्चितच आपणा सर्वांच्या सहकार्याने कर्जत , जामखेड तालुक्यात शिवसेना वाढीसाठी प्रयत्न करु .तसेच कर्जत, जामखेड तालुक्यातील जुने विविध बंधारे दुरुस्तीसाठी व खोलीकरणासाठी प्रयत्न करू व मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेचा धडक कार्यक्रम नगर जिल्ह्यापासून सुरु करू.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार राज्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. समन्वयातून काम करून जनतेचे प्रश्न सोडवून शिवसेनेचे ध्येय धोरणे तळागाळात पोहचवू तसेच शिवसेना पक्ष वाढीबाबद कधीही संपर्क करा मी व नगर जिल्हा शिवसेना सदैव आपल्यासाठी उपलब्ध आहे अशी ग्वाही ना शंकरराव गडाख यांनी शिवसंवाद घोंगडी बैठकी प्रसंगी कर्जत व जामखेड तालुक्यातील शिवसैनिकांना व पदाधिकाऱ्यांना दिली.

ना शंकरराव गडाख यांनी कर्जत व जामखेड तालुक्यात शिवसंवाद बैठकांचे आयोजन केल्याने शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.ठीक ठिकाणी शिवसैनिकांनी ना गडाख यांचे स्वागत केले. याप्रसंगी नगर दक्षिण शिवसेना जिल्हाअध्यक्ष राजेंद्र दळवी, रावसाहेब खेवरे उत्तर नगर जिल्हाअध्यक्ष शिवसेना, जामखेड तालुका शिवसेना अध्यक्ष संजय काशीद, कर्जत तालुका शिवसेना अध्यक्ष, निलेश पवार सरपंच बावी, सावता हजारे, चंद्रकांत घालमे, दीपक गांगर्डे, उपसरपंच दादा मंडलिक, विश्वनाथ राऊत मा जी प सदस्य, प्रशांत शिंदे सरपंच जवळा, दयानंद कतले तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस जामखेड, राजेंद्र राऊत,गणेश काळे, किरण हजारे आदींसह जामखेड, कर्जत तालुक्यातील शिवसैनिक, शाखाप्रमुख शिवसेनेचे विविध पदाधिकारी, युवासेना पदाधिकारी आदी उपस्थित होते.

ना शंकरराव गडाख यांनी कर्जत व जामखेड तालुक्यातील विविध गावांत शिवसैनिकांच्या शिवसंवाद घोंगडी बैठकांचे आयोजन करत शिवसैनिकांशी संवाद साधल्याने शिवसैनिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले याचा निश्चितच उपयोग शिवसेना संघटन वाढीसाठी होणार आहे.

- राजेंद्र राऊत, जिल्हाअध्यक्ष नगर दक्षिण शिवसेना.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com