...अन् बंद ढाब्याबाहेर बसून मंत्री शंकरराव गडाखांनी डबा खाल्ला
सार्वमत

...अन् बंद ढाब्याबाहेर बसून मंत्री शंकरराव गडाखांनी डबा खाल्ला

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका प्रतिनिधी | Newasa

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा उस्मानाबादचे पालक मंत्री शंकरराव गडाख Minister Shankarrao Gadakh यांनी प्रवासा दरम्यान चक्क बंद ढाब्याबाहेर बसून घरच्या जेवणाचा डबा खाल्ला आहे.

ना. गडाख हे दोन दिवस उस्मानाबाद दौऱ्यावर होते. हा दौरा आटोपून अहमदनगरकडे परत जात असताना त्यांनी एका बंद असलेल्या धाब्यावर जेवण केले. विशेष म्हणजे कॅबिनेट मंत्री असून गडाख यांनी घराचा जेवणाचा डबा उघडून खाटेवर बसून जेवण केले. याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उस्मानाबादमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम तसेच विविध कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी अहमदनगरकडे परतण्याचा निर्णय घेतला. घरी परतत असताना त्यांना वाटेत भूक लागली. त्यामुळे त्यांनी बंद असलेल्या एका ढाब्यावर त्यांच्या जवळचा घरचा जेवणाचा डबा उघडला. त्या ठिकाणी असलेल्या एका खाटेवर बसून जेवण केले. गडाख हे कॅबिनेट मंत्री जरी असले तरी त्यांनी त्यांच्यातील साधेपणा उपस्थितांना भावला. जेवताना त्यांनी उपस्थित लोकांशी काही विषयांवर चर्चा देखील केली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com