हात करताच मंत्री थांबले, घेतला टपरीवर चहा अन् साधला शेतकरी-व्यावसायिकांशी संवाद

हात करताच मंत्री थांबले, घेतला टपरीवर चहा अन् साधला शेतकरी-व्यावसायिकांशी संवाद

नगर-औरंगाबाद महामार्गावरून जात असताना देवगडफाटा येथे ना. गडाखांनी जाणून घेतल्या अडचणी

देवगडफाटा |वार्ताहर| Devgad Phata

ना. शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आला. नगर-औरंगाबाद महामार्गावरून (Nagar-Aurangabad Highway) जात असताना देवगड फाटा (Devgad Phata) येथील नागरिकांनी हात केला असता लगेच गाडी थांबवून त्यांनी चहाच्या टपरीमध्ये चहा (Tea) घेतला व परिसरातील शेतकरी, नागरिक व व्यवसायिकांशी संवाद साधला व लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जळके बुद्रुक (Jalake Budruk) देवगड फाटा (Devgad Phata) ग्रामस्थांच्या वतीने ना. शंकरराव गडाख (Minister Shankarrao Gadakh) यांचा पत्रकार इकबाल शेख व ग्रामस्थांनी सत्कार यांनी केला.

याप्रसंगी उपस्थित मुळा उजवा कालव्याच्या (Mula Right Canal) टेलच्या शेतकर्‍यांनी सांगितले की, ना. गडाख (Minister Shankarrao Gadakh) निवडून आमदार (MLA) व नामदार झाल्यापासून उन्हाळ्यातही कॅनॉलचे (Canal) पाणी वेळेत मिळाले. विहिरी, बोअरवेलला त्यामुळे फायदा झाला. त्यामुळे चांगली पिके घेता आली असे म्हणत शेतकर्‍यांनी ना. गडाखांचे आभार मानले व त्यांचा सत्कार केला.

यावेळी संवाद साधताना ना. गडाख (Minister Shankarrao Gadakh) म्हणाले, मी सर्वात जास्त आंदोलने शेतकर्‍यांसाठी केली आहे व शेतकर्‍यांच्या अडचणी सोडविण्यास माझे नेहमी प्राधान्य आहे. पाणी, शेतीसह इतरही प्रश्नांवर कधीही निरोप द्या मी आपल्या मदतीसाठी प्रयत्नशील राहील असे म्हणाले.

याप्रसंगी मुळा कारखाना संचालक बाळासाहेब पाटील, महेश मते, चेअरमन संजय जरीपटके, जळके बुद्रुकचे उपसरपंच नितीन दहातोंडे, उस्मान शेख, माजी सरपंच अशोक रुपनर, देवगड व्यापारी संघटना अध्यक्ष गणेश भोरे, पोलीस पाटील अशोक पुंड, माजी उपसरपंच बाबुलाल शेख, सतीश बाचकर, माजी उपसरपंच चांगदेव थोरात, बाळासाहेब वरखडे, गणपत मोरे, भाऊराव लोखंडे, समशेर शेख, सत्तार शेख, महादेव शिंदे, संजय बर्डे, लहू औटी, रहेमान पटेल, कचरु कोतकर, बदरोदिन पटेल, मौलाना अल्ताब, अशपाक शेख, शकील शेख, मकसूद शेख, सुधीर साळवे, खडका येथील माजी सरपंच सुनील पवार, उत्तम मिसाळ, संजय भांगे, निवृत्ती थोपटे, राजेंद्र गिते, ज्ञानेश्वर पवार आदी उपस्थित होते.

ना. शंकरराव गडाख यांनी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शेतकर्‍यांना दिलेला शब्द पाळला व परिसरातील शेती फुलली. मोठ्या प्रमाणात शेतीचे उत्पन्न वाढले व शेती बरोबर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला.

-नंदू दहातोंडे, शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com