पत्रकार हा समाजातील सर्वात महत्वाचा घटक - ना. गडाख

पत्रकार हा समाजातील सर्वात महत्वाचा घटक - ना. गडाख

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

पत्रकारांमुळे अन्यायाला वाचा फुटते व सामान्य माणसाला न्याय मिळतो. करोना काळात देखील पत्रकारांनी प्रसार माध्यमातून योग्य माहिती पुरवली. आज पत्रकार मंडळींसाठी महत्वाचा दिवस आहे. आज माझ्या व शासनाच्यावतीने शुभेच्छा देतो. तलवारीच्या पाती पेक्षा लेखणी श्रेष्ठ आहे. युवा पत्रकारांनी असाच पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

तालुक्यातील विविध पत्रकार संघांच्यावतीने पत्रकार दिनानिमित्ताने नेवासा येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अशोक डहाळे होते.

यावेळी पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विठलराव लंघे, भाजपा नेते सचिन देसरडा, पुणतांबा येथील साईनारायण महाराज, उपनगरअध्यक्ष लक्ष्मण जगताप, सतीश पिपळे, समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. करण घुले, यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकार बांधवांना झाड व पत्रकारिता करताना लागणार्‍या वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच ज्येष्ठ पत्रकारांना गौरविण्यात आले.

स्वागत सुधीर चव्हाण यांनी केले मान्यवरांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर याच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

शहरातील प्रणाम हॉल येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, नेवासा प्रेस क्लब, नेवासा फाटा प्रेस क्लब, महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटना, प्रेस व संपादक सेवा संघ, केंद्रीय पत्रकार संघ, व ‘आम्ही नेवासकर’ यांच्यावतीने एकत्रितपणे पत्रकारदिन साजरा करण्यात आला.

यावेळी नेवासा प्रेस क्लब अध्यक्ष सुधीर चव्हाण, नेवासा फाटा प्रेस क्लब संदीप गाडेकर, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे मोहन गायकवाड, प्रेस व संपादक गणेश बेल्हेकर, केंद्रीय पत्रकार संघ कमलेश गायकवाड यांच्यासह कैलास शिंदे, राजेंद्र वाघमारे, मकरंद देशपांडे, चंद्रकांत दरंदले, संदीप वाखुरे, अरुण सोनकर, नानासाहेब पवार, विठ्ठलं उदावंत, रमेश शिंदे आदींसह तालुक्यातील पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

सूत्रसंचालन देविदास साळुंके यांनी केले तर आभार बाळकृष्ण पुरोहित यांनी मानले. ऑनलाईन व्हिडीओच्या माध्यमातून भास्करगिरी महाराज यांनी शुभेच्छा दिल्या. पूर्णवेळ योगदान देणार्‍या पत्रकारांच्या मानधनाबाबत सरकारने विचार करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com