मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख रुग्णालयात दाखल

मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख रुग्णालयात दाखल

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

नेवासाचे आमदार व राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Minister of Soil and Water Conservation Shankarrao Gadakh) यांना मणक्याच्या त्रास (Spine Problems) होऊ लागल्याने त्यांना मुंबईतील रिलायन्स रुग्णालयात (Reliance Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

विधानपरिषदेच्या (Legislative Councils) सहा रिक्त जागांसाठी आज विधानभवनात मतदान झाले. त्यासाठी ना.गडाख (Minister Shankarrao Gadakh) हे मुंबईत गेले होते. मतदानाला (Voting) जात असताना त्यांना मणक्यात (Spine) वेदना झाल्या. मणक्यात वेदना झाल्याने त्यांना रिलायन्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विधानपरिषदेच्या मतदानाची प्रक्रिया आज सकाळपासून सुरू आहे. शिवसेनेचे सर्व आमदार पवई येथील वेस्टइन हॉटेलमध्ये होते. मंत्री गडाख (Minister Shankarrao Gadakh) हे मतदानासाठी गेले असता त्यांचे जुने दुखणे पुन्हा उद्भवले. त्यामुळे त्याच्या मणक्याचा त्रास होत असल्याचे सांगितले जात आहे.

त्यांना स्लीप डिस्कची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना मुंबईतील खासगी रुग्णालयात चार दिवसांपासून उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी मतदान केल्यावर ते पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. विधानपरिषदेचे मतदान करण्यासाठी जाताना व्हील चेअरवर गेले. तेथे सेनेचे आमदार तसेच विधानसभाचे उपसभापती नरहरी झिरवळ (Narhari Jirwal, Deputy Speaker of the Legislative Council), शिरुरचे आमदार अशोक पवार, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी गेटवर जात गडाख यांची विचारपूस केली. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनीही त्यांची विचारपूस करून काळजी घ्या असे सांगितले.

रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते इतर आमदारांचा आधार घेत विधानभवनातील मतदान केंद्रावर पोचले. तेथे त्यांनी मतदान केले. त्यानंतर ते रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून त्यांना पाठीचा आजार आहे. चार दिवसांपूर्वी प्रवासात मोठा जर्क बसल्याने त्रास सुरू झाला. मुंबई (Mumbai) येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com