‘त्या’ ऑडिओ क्लिपप्रकरणी एसपींनी मागविला अहवाल

तक्रार नसली तरी पोलिसांकडून दखल
‘त्या’ ऑडिओ क्लिपप्रकरणी एसपींनी मागविला अहवाल

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व त्यांचे पुत्र उदयन गडाख यांना ‘उडविण्याची’ भाषा करणारी ऑडिओ क्लिप रविवारी व्हायरल झाली आहे. या व्हायरल क्लिपसंदर्भात अद्याप पोलिसांत तक्रार झाली नसली तरी पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्याकडून याबाबत अहवाल मागविला आहे.

‘त्या’ ऑडिओ क्लिपप्रकरणी एसपींनी मागविला अहवाल
गडाखांच्या पीए वरील गोळीबार प्रकरणातील शिरसाठला 5 दिवसांची पोलीस कोठडी

मंत्री गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर तालुक्यातील लोहगाव शिवारात शुक्रवारी रात्री जीवघेणा हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी 5 फायर केले होते. त्यातील दोन गोळ्या राजळेंच्या शरिरात घुसल्या होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू आहेत. हे प्रकरण ताजे असतानाच रविवारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. क्लिपमध्ये मंत्री गडाख आणि त्यांचे पुत्र उदयन यांना जीवे मारण्याविषयी उल्लेख आहे.

‘त्या’ ऑडिओ क्लिपप्रकरणी एसपींनी मागविला अहवाल
मंत्री शंकरराव गडाखांसह मुलाच्या हत्येचं कारस्थान?

यासाठी 21 विदेशी बनावटीच्या पिस्तुल आणल्याचा दावा या क्लिपमधील संवादात करण्यात आला आहे. राजळे यांच्यावर जीवघेणा गोळीबार झाल्यानंतर ही क्लिप समोर आल्याने प्रकरणाचे गांभिर्य वाढले आहे. दरम्यान, या व्हायरल क्लिपमधील आवाज कोणाचा आहे, हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र मंत्री गडाख आणि त्यांच्या कुटुंबाचा ज्या पद्धतीने उल्लेख करण्यात आला त्यावरून हा व्यक्ती त्याच परिसरातील असावा, असा अंदाज आहे.

राजळे गोळीबार ; तपास डीवायएसपींकडे

मंत्री गडाख यांचे स्वीय सहायक राहुल राजळे यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली. शुक्रवारी रात्री लोहगाव परिसरात राजळे यांच्यावर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी विकास राजळे यांच्या फिर्यादीवरून चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नितीन शिरसाठ याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. इतर आरोपी बबलू लोंढे, संतोष भिंगारदिवे व ऋषिकेश शेटे अद्यापही पसार आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास आता पोलीस उपअधीक्षक मुंढे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com