वाटापूर-तामसवाडी पुलाच्या कामाची ना. गडाखांनी केली पाहणी

काम दर्जेदार व वेळेत होण्यासाठी अधिकार्‍यांना दिल्या सूचना
वाटापूर-तामसवाडी पुलाच्या कामाची ना. गडाखांनी केली पाहणी

सोनई |वार्ताहर| Sonai

नामदार शंकरराव गडाख (Minister Shankarao Gadakh) यांनी नेवासा तालुक्यातील करजगाव-वाटापूर- तामसवाडी-निपाणीनिमगाव व शेजारील इतर गावांना जोडणार्‍या नदीवरील पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाची नुकतीच (bridge over the river work) पाहणी करून ठेकेदारांस (Contractor) काम दर्जेदार व पूर्ण करणेबाबत सूचना (order) दिल्या.

वरील गावांना जोडणारा हा पुल संबंधित गावचे शेती आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. पुलाअभावी या गावातील शेतकरी (Farmers) , विद्यार्थी व सर्वसामान्य माणसाना मोठी कसरत करावी लागत होती.

2018 मध्येच शासनाने पुलाचे काम सुरू करण्यास मंजुरी दिल्यानंतरही गेल्या अडीच वर्षांपासून या पुलाचे काम रेंगाळले होते. कामाचे भूमीपूजन झाल्यानंतर काम जवळपास ठप्प होतं.

2019 च्या निवडणुकीत या मतदार संघाचं नेतृत्व ना. शंकरराव गडाख यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी रखडलेल्या या कामाची तातडीने माहिती घेऊन पुलाचे कामासाठी पुरेसा निधी मिळवून दिला. तसेच कामाचा दर्जा चांगला राखणेबाबत व दोन महिन्यांच्या आत पुल वाहतुकीसाठी खुला करून देण्याचे आदेश ठेकेदारास व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना दिले.

याप्रसंगी मुळा कारखान्याचे संचालक भाऊसाहेब मोटे, वाटापूरचे अ‍ॅड. पांडूरंग माकोणे, कर्णासाहेब औटी, भिकाभाऊ जगताप, लहानूभाऊ काळे, कर्णासाहेब सुकळकर, तामसवाडीचे सरपंच चंद्रकांत जगताप, देवीदास जगताप, सारंगधर फोपसे, बाबासाहेब फोपसे, लक्ष्मण फोपसे, अरुण लाटे, रमेश कोलते, संजय काळे, गोवर्धन ऐनर, अण्णा जाधव, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता चव्हाण, उपअभियंता कोकते आदींसह पंचक्रोशीतील कार्यकर्ते, शेतकरी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

हा पूल अनेक गावांसाठी महत्त्वाचा होता. त्यात विविध अडचणी येत होत्या. परंतु 2019 च्या निवडणुकीत ना. शंकरराव गडाख निवडून आल्यानंतर खर्‍या अर्थाने या कामाला गती मिळाली. आता ना. गडाख यांच्या पाठपुराव्यामुळे पुलाचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी लवकरच खुला होणार आहे.

- चंद्रकांत जगताप, सरपंच, तामसवाडी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com