सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावे

मंत्री देसाई; हिंदू शिवगर्जना मेळाव्यात मार्गदर्शन
सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकार्‍यांनी प्रयत्न करावे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर महापालिकेच्या रस्त्यांसह विविध प्रकल्पासंदर्भातील प्रस्ताव नगर विकास विभागाकडे आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने तातडीने हे प्रस्ताव मार्गी लावले जातील. 5 तारखेला मुंबईतील दसरा मेळाव्यासाठी जिल्ह्यातून जास्तीत-जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, यासाठी पदाधिकार्‍यांनी गावपातळीवर जाऊन बैठका घ्याव्यात. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न पदाधिकार्‍यांनी करावा. त्यांच्या अडचणी सुटल्या नाही तर थेट मला फोन करा, अशा सूचना राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी येथे दिल्या.

शिवसेना (शिंदे गट) संपर्क यात्रेनिमित्त हिंदू शिवगर्जना मेळाव्याचे नक्षत्र लॉन्समध्ये आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना मंत्री देसाई बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, बाबूशेठ टायरवाले, उपजिल्हाप्रमुख अंकुश चितळे, सुभाष लोंढे, मदन आढाव, संग्राम शेळके, तालुकाप्रमुख बंडू रोहोकले, नंदकुमार ताडे, कैलास माने, विष्णूपंत ढाकणे, अभिषेक डहाळे यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी शिवसेनेत प्रवेश करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

खा. लोखंडे म्हणाले, साखर सम्राटांच्या जिल्ह्यात सर्वसामान्य शिवसैनिकांना बळ देण्याचे काम केल्यास ते जनतेच्या समस्या सोडवतील. या कार्यकर्त्यांतून पुढे सरपंच, सभापती व आमदार होणार आहेत. मुंबईच्या दसरा मेळाव्यातून परतल्यानंतर कार्यकर्त्यांनी आपआपल्या भागातील प्रश्न सोडावेत. जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याने शंभूराज देसाई यांना पालकमंत्री करण्याची मागणी त्यांनी केली. संपर्कप्रमुख सचिन जाधव यांनी प्रास्तविकात आगामी काळात नगर व पारनेरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून येणार असल्याची ग्वाही दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com