मंत्री विखे यांनी अधिवेशनात संगमनेर जिल्हा घोषित करावा

शिवसेनेचे शहरप्रमुख कतारी
मंत्री विखे यांनी अधिवेशनात संगमनेर जिल्हा घोषित करावा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

महसूल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधीमंडळ अधिवेशनात संगमनेर जिल्हा घोषित करावा, अशी मागणी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी केले आहे.

प्रसिद्धी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले, अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्तारलेला आहे. सध्याचे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण हे प्रशासकीय, वैद्यकीय, शैक्षणिक कामकाजासाठी जिल्ह्यातील उत्तर भागातील आदिवासी आणि ग्रामीण जनतेला गैरसोयीचे ठरत आहे. जिल्ह्याचे विभाजन करून संगमनेर जिल्ह्याची निर्मिती करणे हा एकमेव पर्याय आहे. संगमनेर जिल्हा झाल्यास अदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांची वर्षानुवर्षे प्रलंबित असणारी न्याय्य मागणी पूर्ण होईल. महसूल खात्याअंतर्गत सध्याच्या विधीमंडळ अधिवेशनात प्रस्ताव पारित करून संगमनेर जिल्ह्याची मागणी पूर्णत्वास न्यावी.

संगमनेर जिल्हा कृती समिती, सर्व पक्षीय संघटना व पत्रकार बांधवांनी केलेल्या आंदोलनाला स्वतःहून दखल घेतलेल्या विखे पाटील यांनी त्या कृती समितीच्या शिष्टमंडळाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई येथे भेट घडवून आणली होती. त्यावेळी उच्चस्तरीय सचिव व अधिकारी देखील उपस्थित होते. मात्र, केवळ आश्वासना व्यतिरिक्त त्यानंतर कोणतीही ठोस कृती झाली नाही. संगमनेर जिल्हा मागणीचे आंदोलन हे मागे पडले. तसेच नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे हे नगर येथे आले होते. त्यावेळी सुद्धा नगर जिल्ह्याचे विभाजन करावे, अशी मागणी आपण केली होती.

संगमनेर व अकोल्याचे नगरचे अंतर दीडशे ते पावणे दोनशे किलोमीटरच्या आसपास आहे. संगमनेर व अकोले करांना नाशिक जवळ पडते. परंतु नगरचे अंतर दुपटीने असल्याने लवकरात लवकर संगमनेर जिल्हा घोषित करून संगमनेरकर व अकोलेकर तसेच आसपासच्या जनतेच्या मनातील निर्णय घ्यावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, शिवसेना संगमनेर सचिव प्रथमेश बेलेकर, दीपक वनम, विकास डमाळे, वेणुगोपाल लाहोटी, संभव लोढा, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितलताई हासे, संगीताताई गायकवाड, सुरेखाताई गुंजाळ, आशाताई केदारी, युवासेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवासेना शहर प्रमुख अमोल डुकरे, अक्षय गाडे, अक्षय बिल्लाडे, अजिज मोमीन, अनुप माळस, दीपकराव साळुंखे, पठार भागातील रंगनाथ फटांगरे, उपतालुकाप्रमुख अमित फटांगरे, योगेश खेमनर, लक्ष्मण सोनार, रवी गिरी, नारायण पवार, राजू सातपुते, पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेते अशोक सातपुते, त्रिलोक कतारी, प्रशांत खजुरे, युवासेनेचे फरोज कतारी, केवल कतारी, सागर भागवत, तसेच शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी संगमनेर जिल्हा व्हावा, अशी मागणी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com