महाविकास आघाडी सरकार हे महावसुलीचे सरकार होते - महसुलमंत्री ना. विखे

'त्या' सरकारमुळे निळवंडे धरणाच्या कालव्यांना निधी मिळाला नाही
महाविकास आघाडी सरकार हे महावसुलीचे सरकार होते - महसुलमंत्री ना. विखे

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले तालुक्यातील जनतेला न्याय मिळाला पाहिजे यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड यांनी आयुष्यभर स्वाभिमान जागृत ठेवला. निळवंडे धरणाचे कामाला भाजप-सेना सरकार असतांना गती मिळाली. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात निळवंडे धरणाच्या कालव्यांना निधी मिळू शकला नाही. असे महसुलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

कोव्हिड काळात किती मंत्री तुमच्याकडे आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 टक्के लोकांना मोफत धान्य दिले. महाविकास आघाडी सरकार हे महावसुलीचे सरकार होते. अनेक मंत्री, अधिकारी जेलमध्ये गेले. या राज्यात एकनाथराव व देवेंद्र यांचे सरकार आले. पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. मागील सरकारने दारूचे दर कमी केले. नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा, देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद द्यायचे आहे कारण त्यांनी माझ्या सारख्या कार्यकर्त्यांला महसूलमंत्री पदाची संधी दिली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री राज्यभर फिरत आहेत. पुढील 15 दिवसांत लंपी आजाराने ज्या पशुधनाचा मृत्यू झाला त्या पशुधन मालकांना नुकसानभरपाई मिळणार आहे. देशात पहिल्यांदा द्रौपदी मुर्मु यांच्या सारख्या एका आदिवासी महिलेला राष्ट्पती पदी भाजपने विराजमान केले. अगस्ति कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये भाजपची सत्ता आली पाहिजे. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांचे 100 टक्के पंचनामे करण्याचे आदेश आपण तहसीलदार यांना दिले आहे.

निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून 2023 साली शेतकर्‍यांना पाणी देणार आहे. अकोले तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. सेवा पंधरवाडा सप्ताह सूरु आहे. लोकांना काही अडचणी येत असेल तर थेट मला फोन करा. ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्र नव्हे, शिंदे -फडणवीस सरकारची लोकप्रियता वाढत चालली आहे. ही त्यांची पोटदुखी आहे. असे ना.विखे पाटील यांनी सांगितले. केंद्र व राज्यात आपल्या पक्षाचे सरकार आहे, अगस्ति कारखाना चालविण्यासाठी जी जी मदत लागेल ती देऊ अशी ग्वाही ना.विखे पाटील यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com