ना. विखे पाटील यांनी साधला शेतकर्‍यांशी संवाद साधला

ना. विखे पाटील यांनी साधला शेतकर्‍यांशी संवाद साधला

माळवाडगाव |प्रतिनिधी| Malvadgav

श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारातील गट नंबर 190 मधील सिंधुबाई मुठे यांच्या शेतावरील सोयाबीनचे अतिवृष्टीमुळे शंभर टक्के नुकसानीची पाहणी केल्यानंतर अशाच प्रकारचे अनेक शेतकर्‍यांचे परिसरामध्ये सोयाबीन व कपाशीचे नुकसान झाल्यामुळे त्यांचे शंभर टक्के पूर्ण पंचनामे करून लवकरच दिपावली नंतर शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील, असे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे महसूल व दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुठेवाडगाव येथे बोलताना केले.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक राकेश ओला, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, प्रांताधिकारी अनिल पवार, कृषि अधीक्षक जगताप, उपविभागीय कृषी अधिकारी नलगे, तहसीलदार प्रशांत पाटील, तालुका कृषी साळी, जलजीवनचे उपअभियंता गडदे, सर्व अधिकारी, माजी सभापती व भाजपचे तालुका अध्यक्ष दीपक पटारे, माजी जि. प. सदस्य शरद नवले, माजी आ. भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, गिरीधर आसने, बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, अविनाश लोखंडे, नानासाहेब शिंदे, ननावरे, सारंगधर आसने, डॉ. शंकर मुठे, प्रकाश चिते, महिला तालुका अध्यक्ष सौ. धुमाळ यांच्यासह स्थानिक कार्यकर्ते, पदाधिकारी, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com