शेतकर्‍यांनी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन उत्पन्न वाढवावे

शेतकर्‍यांनी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन उत्पन्न वाढवावे

राज्यमंत्री तनपुरे: कृषी विभागाकडून बियाणे वाटप

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या सव्वा वर्षांपासून कोविड काळात शासनाच्या विविध विभागांनी चांगले काम केले आहे. यामध्ये कृषी विभागाचे योगदान खूप मोलाचे आहे. अधिकारी व कर्मचार्‍यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. कृषी विभागाने चांगले बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिले असून, शेतकर्‍यांनी तांत्रिक मार्गदर्शन घेऊन उत्पादन वाढवावे, असे प्रतिपादन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

कृषी विभाग आत्माअंतर्गत नगर तालुक्यातील डोंगरगण, मांजरसुंबा व पिंपळगाव माळवी येथे नाविन्यपूर्ण बाब योजनेंतर्गत शेतकर्‍यांना राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते सोयाबीन, बाजरी व बेबीकॉर्न बियाण्यांचे, तसेच निविष्ठाचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन, तहसीलदार उमेश पाटील, गटविकास अधिकारी घाडगे, तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले, जेऊर मंडळ कृषी अधिकारी सूर्यकांत शेकडे, कृषी पर्यवेक्षक विजय सोमवंशी, अभिजीत डुक्रे, संजय मेचकर, सुमीधा वाणी, कृषी सहाय्यक उमेश डोईफोडे, सीताराम पटारे, मारुती गवारे, रामदास भुतकर, मीराबाई काळे, श्रीतेज पवार, सोमनाथ तोडमल, भास्कर मगर, दिनेश पाटोळे, मोहन तवले, विलास मोहिते, शशिकांत गायकवाड, गोपीनाथ वाघुले, विजय कदम, अजय कदम उपस्थित होते.

ना. तनपुरे म्हणाले की, शेतकर्‍यांनी आपल्या अडीअडचणींबाबत प्रगतीशील शेतकर्‍यांशी, तसेच कृषी अधिकारी व कर्मचार्‍यांशी वेळोवेळी संवाद केला पाहिजे. त्यामुळे तुमच्या अडचणी दूर होतील. शेतकर्‍यांच्या पीक उत्पादन वाढीसाठी व त्यांच्या उत्पन्नवाढीसाठी जाणीवपूर्वक अधिक प्रयत्न व्हावेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.

लवकरच 33/11 केव्ही सबस्टेशन

जेऊर येथील सबस्टेशनवरुन डोंगरगण आणि आसपासच्या गावांना वीजपुरवठा होतो. मात्र, त्यामुळे अतिरिक्त भार या सबस्टेशनवर येत असल्यामुळे पिंपळगाव माळवी अथवा डोंगरगण येथे नवीन 33/11 केव्ही सबस्टेशन लवकरच होईल. त्यासाठीच्या तांत्रिक बाबी लवकरच पूर्ण होतील आणि या भागातील विजेचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती राज्यमंत्री तनपुरे यांनी दिली. याशिवाय, पिंपळगाव माळवी तलावातून डोंगरगणसह विविध गावांना होणार्‍या पाणीपुरवठ्याच्या योजना सौर उर्जेवर चालविण्याचा प्रस्ताव असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com