ग्रामस्थ एकत्र आल्याने सडे गाव आत्मनिर्भर झाले - ना. प्राजक्त तनपुरे

ग्रामस्थ एकत्र आल्याने सडे गाव आत्मनिर्भर झाले - ना. प्राजक्त तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील सडे गावातील युवकांनी लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत पानसंबळ यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गावाचा पूर्वीचा इतिहास बदलून गावाच्या विकासासाठी सर्व युवक एकत्र आल्याने सडे गावाचा चेहरामोहरा बदलून टाकून गाव आता आत्मनिर्भर बनला,असे प्रतिपादन राज्याचे उर्जा, नगरविकास, आदिवासी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

तालुक्यातील सडे गावातील लोकार्पण सोहळाप्रसंगी ना. तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाबँकेचे संचालक तथा बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, उपसभापती प्रदीप पवार, गटनेते रवींद्र आढाव, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, उपसरपंच सौ. कल्पना साळवे उपस्थित होते.

यावेळी ना. तनपुरे यांची मिरवणूक काढण्यात आली. ग्रामसचिवालय इमारत, अंगणवाडी इमारत, आरओ प्लॅन्टचे उद्घाटन करण्यात आले. ना. तनपुरे म्हणाले, आमदार झाल्यापासून तालुक्यातील बहुतेक गावांसाठी आमदार निधी उपलब्ध करून दिला असून ज्या गावांना अजून निधी मिळाला नाही, त्यांनाही निधी उपलब्ध करून दिला जाईल. बारागाव नांदूर गटातील बहुतेक गावांना निधी दिला आहे. करोनामुळे शासनाकडून निधी मिळण्यावर बंधने होती. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेवरून राज्यातील आदिवासी मतदारसंघाचा अभ्यास दौरा केला.

जातींचे दाखले घरपोहोच करण्याच्यादृष्टीने तेथील प्रशासनास सूचना दिल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा करून रिक्त जागा भरण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांची बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे सांगितले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महावितरणच्या विद्युत सहाय्यक भरतीचा प्रश्न मार्गी लागला असून एक हजार जणांचा प्रश्न सुटला असून उर्वरित भरतीबाबत प्रयत्न सुरू असल्याचे ना. तनपुरे यांनी सांगितले.

अरुण तनपुरे म्हणाले, सरपंच व त्यांच्या सहकार्‍यांनी गावासाठी चांगले काम केले असून युवकपद मिळाल्यावर कामाच्या रूपाने एक आदर्श जनतेसमोर निर्माण केला आहे.त्यांच्या कामामुळे त्यांनी सुचविलेली कामे मंत्रीमहोदय निश्चित पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी सरपंच चंद्रकांत पानसंबळ यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. राष्ट्रवादीचे युवकाध्यक्ष धीरज पानसंबळ, संदीप कसबे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवकाध्यक्ष प्रकाश देठे, नवाज देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे यांची भाषणे झाली.

कार्यक्रमास डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक भारत तारडे, बाजार समितीचे संचालक प्रभाकर पानसंबळ, के. एम. पानसरे, अण्णासाहेब बाचकर, जालिंदर आढाव, सुरेश निमसे, प्रभाकर गाडे, दशरथ पोपळघट, दीपक तनपुरे, बाळासाहेब लहारे, अतुल तनपुरे, दत्तात्रय पानसंबळ, सेवा संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब पानसंबळ, अनिल वाघ, दशरथ धोंडे, अरुण पानसंबळ, दत्ता धोंडे, बापूसाहेब तनपुरे, गोरक्षनाथ धोंडे, अण्णासाहेब पानसंबळ, चांद शेख, भीमराज खेडेकर, शिवाजी पानसंबळ, शंकर कसबे, बापूसाहेब नान्नोर, शिवाजी धामोरे, ग्रामपंचायत सदस्य अमोल धोंडे, धनंजय पानसंबळ, दिलीप जठार, शामराव खेतमाळस, सरपंच निवृत्ती देशमुख, भाऊसाहेब गाडे, गोरक्षनाथ दुशिंग, विलास शिरसाठ, आय्युब पठाण, सुनील अडसुरे, भारत भुजाडी, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. सदस्य गणेश घोरपडे यांनी आभार तर आप्पासाहेब ढोकणे यांनी सूत्रसंचालन केले.

Related Stories

No stories found.