हनुमान चाळीसा वाचण्याऐवजी मोदींकडून कोळसा आणावा

उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांचा राणा दाम्पत्यांना टोला
हनुमान चाळीसा वाचण्याऐवजी मोदींकडून कोळसा आणावा

करंजी |प्रतिनिधी| Karanji

हनुमान चालीस, मशिदीवरील भोंगे या धार्मिकतेचे राजकारण करून राज्यात जातीय तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सुरू आहेत. खा. नवनीत राणा यांनी मुंबईला मातोश्रीवर येऊन हनुमान चालीसा वाचण्याऐवजी दिल्लीला जाऊन मोदी सरकारकडून राज्यातील भारनियमन कमी करण्यासाठी कोळसा आणावा, असा मिस्किल टोला उर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी राणा दाम्पत्यांना लगवाला.

पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे सुमारे 70 लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन मंत्री तनपुरे यांच्या हस्ते झाले. तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे अध्यक्षस्थानी होते. राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, प्रसाद शुगर या भागातील एकाही ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा ऊस शेतात शिल्लक ठेवणार नाही. तसेच तिसगाव, मिरी, कासार पिंपळगाव सबस्टेशनचा लोड कमी करण्यासाठी जवखेडे खालसा या ठिकाणी देखील नवीन सबस्टेशन लवकरच मंजूर करणार असल्याची ग्वाही मंत्री तनपुरे यांनी यावेळी दिली.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, राहुल गवळी, उद्धव दुसंग, सुनील कराळे, शरद गवळी, सरपंच सुधाकर वांढेकर, राजेंद्र पाठक, सचिन शिंदे, नितीन लोमटे, जगन्नाथ लोंढे, माणिकराव लोंढे, के. एम. मचे, राजू शेख, सुनील पुंड, संजय लवांडे, सुनील लवांडे, बाळासाहेब घुले, युवानेते अजय पाठक, देवेंद्र गीते, तुळशीराम शिंदे, पप्पू शिंदे, संतोष आठरे, सागर कराळे, प्रतिक घोरपडे, आबासाहेब बर्डे, अशोक बावणे, रमेश आठरे, राजकुमार घोरपडे, किरण शेलार, सुखदेव शेंडे, सुरेश बर्फे, जवखेडचे सरपंच इरफान पठाण, उपसरपंच उत्तम कासार, यांच्यासह ग्रामपंचायतचे सदस्य, सेवा संस्थेचे सदस्य व परिसरातील ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण कासार यांनी केले.

वाघ यांना जिल्हा परिषदेची संधी?

माजी सरपंच अमोल वाघ विकास कामाचा पाठपुरावा करण्यात कार्यतत्पर असून गावाबरोबरच इतर गावात देखील त्यांचा कार्यकर्त्यांशी चांगला जनसंपर्क आहे. गावात त्यांनी विकासाभिमुख कार्य केल्यामुळे त्यांच्याकडे आणखी मोठी जबाबदारी देण्यास काही हरकत वाटत नाही, असे मंत्री तनपुरे यांनी संकेत दिल्याने अमोल वाघ यांना जिल्हा परिषद निवडणुकीसाठी संधी मिळण्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.

Related Stories

No stories found.