गर्दी टाळण्यासाठी गावात लस देण्याचे नियोजन करा

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या तालुका प्रशासनाला सुचना
गर्दी टाळण्यासाठी गावात लस देण्याचे नियोजन करा

तिसगाव |वार्ताहर| Tisgav

तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये करोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात परिसरातील 25 ते 30 गावांमधील लोकांची गर्दी होत आहे. या गर्दीमुळे करोनाचा धोका निर्माण होऊ नये, होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक गावातच करोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन करा अशा स्पष्ट सूचना राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांनी तालुका प्रशासनाला दिल्या आहेत.

आंबेजोगाई, बीड, यवतमाळ या राज्यातील विविध भागाचा दौरा करून त्याभागात ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी येणार्‍या सर्व अडचणी दूर करून त्या भागात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू करून दोन दिवसांपूर्वीच मतदार संघाच्या दौर्‍यावर आलेले मंत्री तनपुरे यांनी करंजी, शिराळ, चिचोंडी, तिसगाव, मिरी या भागाचा दौरा करत तहसीलदार श्याम वाडकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे, तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. बाबासाहेब होडशीळ, डॉ. अर्चना लांडे यांच्याशी चर्चा करून तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात करोना लस घेण्यासाठी पहाटेपासूनच रांगेत उभे राहणार्‍या लोकांची वाढती गर्दी लक्षात घेता या गर्दीमुळे करोना कमी होण्याऐवजी आणखी वाढू शकतो, यामुळे मंत्री तनपुरे यांनी तिसगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणार्‍या प्रत्येक गावात करोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन करा, जेणेकरून तिसगाव केंद्रात लोकांची गर्दी होणार नाही. मंत्री तनपुरे यांनी केलेल्या सूचनांमुळे परिसरातील विविध गावच्या नागरिकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

राज्यमंत्री तनपुरे यांनी सूचना केल्याप्रमाणे प्रत्येक गावात जाऊन नागरिकांना लसीचे डोस दिले जाणार आहेत. ज्या गावात लस देण्याचे नियोजन केले जाईल, त्या गावात इतर गावातील लोकांनी लस घेण्यासाठी येऊ नये. त्यांना त्यांच्याच गावात डोस देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

-डॉ. बाबासाहेब होडशीळ, आरोग्य अधिकारी, तिसगाव.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com