‘त्या’ पोलीस अधिकार्‍याच्या चौकशीचे आदेश

गृहराज्यमंत्र्यांनी पोलीस महासंचालकांना दिले पत्र
‘त्या’ पोलीस अधिकार्‍याच्या चौकशीचे आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील रस्त्यांच्या, खड्ड्यांच्या प्रश्नांबाबत काँग्रेस पक्षाच्या (Congress Party) वतीने काढण्यात आलेल्या आसूड मोर्चाच्या (Asud Movement) वेळी काँग्रेस पदाधिकारी, महिला कार्यकर्त्यांशी गैरवर्तन करणार्‍या तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके (Topkhana Sub-Inspector of Police Samadhan Solunke) यांच्या चौकशीचे गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांनी आदेश दिले (Minister of State for Home Affairs Satej Patil gave the order) आहेत.

ना. पाटील (Minister Patil) यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना (State Director General of Police) याबाबत लेखी आदेश दिले असून एक महिन्यांमध्ये चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले (Instructions to submit inquiry report) आहेत. काँग्रेस पक्षाच्यावतीने (Congress Party) शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे, रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी, त्याचबरोबर डीपी रस्त्यांचा प्रकल्प मार्गी लावण्याच्या मागणीसाठी नगरकर जनतेच्यावतीने भव्य आसूड मोर्चा महानगरपालिकेवर (Ahmednagar corporation) काढण्यात आला होता. आंदोलनस्थळी पोलीस उपनिरीक्षक सोळंके (Sub-Inspector of Police Samadhan Solunke) यांनी काँग्रेस पदाधिकार्‍यांना तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात येतील अशी धमकी (Threat) दिल्याचे म्हटले होते.

त्यानंतर काँग्रेस पदाधिकार्‍यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते. यामध्ये स्वतः सोळंके हे फिर्यादी आहेत. घडलेल्या घटनेबाबत राज्याचे गृहराज्यमंत्री ना. सतेज पाटील यांनी गंभीर दखल घेत पोलीस महासंचालकांना उपनिरीक्षक सोळंके यांची तात्काळ चौकशी करण्याचे लेखी आदेश (Written order to the Director General of Police to immediately investigate Sub-Inspector Solunke) निर्गमित केले आहेत. या संदर्भामध्ये ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंतराव गारदे, प्रवीण गीते पाटील यांनी ना. पाटील यांची मुंबईत भेट घेत निवेदन दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com