किरकोळ कारणावरून रखडलेली कामे मार्गी लावा

राज्यमंत्री तनपुरे : राहुरी तालुक्यातील विकास कामांबाबत झेडपी अध्यक्षांशी चर्चा
किरकोळ कारणावरून रखडलेली कामे मार्गी लावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) माध्यमातून सुरु असलेल्या कामांची स्थिती, त्यासाठी येणार्‍या अडचणी, विकास कामांसाठी निधी मिळण्यास येणार्‍या अडचणी जाणून घेत, ज्या गावांची कामे किरकोळ कारणांसाठी रखडलेली असतील ती मार्गी लावण्यात यावीत, अशी सुचना राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी केल्या.

जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या दालनात राज्यमंत्री तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी राहुरी (Rahuri) तालुक्यातील कामांचा आढावा (Review of works) घेतला. विशेषत: बारागाव नांदूर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना (Baragaon Nandur Regional Water Supply Scheme), राहुरी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र (Primary Health Center) आणि तेथील पायाभूत सुविधा, नव्या उपकेंद्रांचे प्रस्ताव आणि त्याची सद्यस्थिती यांचा यात समावेश होता. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) प्रकाश खताळ आदींची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी राज्यमंत्री तनपुरे यांनी, ज्या गावात विकास कामे सुरु आहेत, तेथे नेमक्या कोणत्या कारणांमुळे ती थांबली आहेत, हे समजावून घेतले. करोनामुळे अनेक कामांची गती मंदावली असली तरी आता कामांना वेग देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने यंत्रणांनी कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हा नियोजन समिती अथवा ज्या ठिकाणाहून निधी प्राप्त होईल, त्यासाठीचा आवश्यक आराखडा, प्रस्ताव वेळेत सादर होणे आणि त्यासाठी पाठपुरावा करणे अपेक्षित आहे. राज्य स्तरावर यासंदर्भात काही बाबी प्रलंबित असतील तर त्याही निदर्शनास आणून द्यावात, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com