शासन नुकसानग्रस्तांच्या पाठिशी, लवकरच योग्य मदत - राज्यमंत्री तनपुरे

शेवगाव तालुका नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना ग्वाही
शासन नुकसानग्रस्तांच्या पाठिशी, लवकरच योग्य मदत - राज्यमंत्री तनपुरे

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

या तालुक्यात पूर कधीही पाहिलेला नाही. अचनाक ढगफुटी झाल्यामुळे अत्यंत दुर्दैवी प्रसंगाचा सामना शेवगावकरांनी (Shevgav) केला. या संकट काळात धीर सोडू नका. या पुरामुळे (Flooding) दहा गावांत झालेले नुकसान (Losses) हे कधीही भरून निघणार नाही. परंतु शासन तुमच्या पाठीशी आहे. घुले कुटुंबीयही (Ghule Family) परिस्थितीवर नियंत्रण (Control of the situation) ठेवून आहेत. सर्व अधिकारी व त्यांच्या टीम व्यवस्थित पंचनामे करून अहवाल सादर करतील. शासन योग्य पध्दतीने मदत करील अशी ग्वाही देतो, असा दिलासा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिला.

ना. तनपुरे (Minister of State Prajakt Tanpure) यांनी तालुक्यातील नंदीनी, चांदणी, वटफळी या तीन नद्यांना (River) आलेल्या पुरामुळे (Flooding) झालेल्या नुकसानीची (Loss) गुरूवारी (दि.2) रोजी वडुले (Vadule), भगुर (Bhagur), वरुर (Varur), खरडगाव (Khardgav) व आखेगाव (Akhegav) येथे येथे जाऊन पाहणी केली. यावेळी वडुले बुद्रुक (Vadule Budruk) येथे ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले (Zilla Parishad President Rajshri Ghule), पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले (Panchayat Samiti Speaker Dr. Shitij Ghule) , तहसीलदार अर्चना भाकड, गटविकास अधिकारी महेश डोके, काकासाहेब नरवडे, राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुकाध्यक्ष कल्याण नेमाणे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी गणेश वाघ, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, महावितरणचे किरण लोहारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संकल्प लोणकर, वडुले सरपंच प्रदिप काळे, भीमराज सागडे, भगुर सरपंच वैभव पुरनाळे, भागवत लव्हाट, वरुर येथील उपसरंपच गोपाळ खांबट, मधुकर वावरे, आखेगाव सरपंच गोर्डे, कमलेश लांडगे आदी उपस्थित होते.

यावेळी ना. तनपुरे म्हणाले, तालुक्यात पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरला आहे. अशांचे अधिकार्‍यांनी त्वरीत फॉर्म भरून 72 तासांच्या आत ते रिपोर्ट कंपन्यांना सादर करावेत. पिकांचा ज्यांनी विमा भरला नाही त्यांचे व घरांच्या पडझडीचेही पंचनामे करण्याचे काम ही युध्द पातळीवर सुरू आहे. जिवीतहानी झाली नाही. मात्र, पशुधनाची मोठी हानी झाली आहे. त्याचीही आकडेवारी प्रशासन घेत आहे. शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या बाबतही आपण निर्णय घेऊन मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. अन्नधान्य पाण्यामुळे भिजले आहे. त्यांना तात्काळ मोफत धान्य देण्यात येईल. साधारणत: 300 ते 400 विजेचे खांब पडल्याने शेती पंपाचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.

विजेच्या खांबाची ऑर्डर दिली असून कामे त्वरीत पूर्ण करण्यासाठी आणखी मनुष्यबळ वाढवू. काही ठिकाणी चिखल, दलदल असून तेथे कामे करण्यास अडचणी येत आहेत. तेथे ग्रामस्थांनी सहकार्य करावे. कुठेही काम थांबणार नाही. शेतीता वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू. राजश्री घुले म्हणाल्या, शेवगाव पाथर्डी तालुक्यात कोल्हापूर, सांगलीच्या थर्तीवर वेळप्रसंगी सर्व नियम बाजुला करून मदत मिळावी. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे विषय असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू. पुरामुळे पूरग्रस्त गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न समोर आला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील सर्व अधिकार्‍यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाच्या टीम गावोगावी जाऊन नागरिकांना मदत करतील. पिण्याच्या पाण्याचे टँक्टर त्वरित सुरू करण्यात येतील.

पीडित महिलांना अश्रू अनावर

डाँ. क्षितीज घुले यांनी वडुले, भगुर म्हस्के वस्ती, वरुर, आखेगाव येथील पिडीतांचे झालेले नुकसान तनपुरे यांना पोटतिडकीने दाखवून पूरग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विनंती केली. यावेळी अनेक पीडित महिलांना अश्रू अनावर झाले. त्या घुले यांच्या गळ्यात पडून रडत होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com