'मुळा धरणातून खरीपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने घ्या'

जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडू यांचे आदेश
'मुळा धरणातून खरीपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने घ्या'

नेवासा | तालुका प्रतिनिधी

शासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेऊन मुळा धरणातून (Mula Dam) खरीप पिकासाठी तातडीने पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडू (Minister of State for Water Resources Bachchu Kadu) यांनी दिले असल्याची माहिती प्रहार जनशक्ती पक्षाचे (Prahar Janashakti Paksha) जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे (Abhijeet Pote) यांनी दिली.

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार धरणग्रस्त कृती समिती अध्यक्ष कृष्णा सातपुते, जिल्हा संघटक महादेव आव्हाड, नेवासा तालुका सरचिटणीस जालिंदर आरगडे यांच्या शिष्टमंडळाने दि.10 ऑगस्ट रोजी मुळा पाटबंधारे विभागाच्या (Mula Irrigation Department) कार्यकारी अभियंता सायली पाटील यांची भेट घेऊन आवर्तन सोडावे या मागणीचे निवेदन दिले. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील तालुक्यांमधे पावसाअभावी पिके धोक्यात आली आहेत. पुर्ण खरीप हंगामातील ऊस, सोयाबीन, कपाशी, तूर, बाजरी, भुईमूग तसेच फळबागांना पाण्याची खूप आवश्यकता असून मुळा धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने खरीप पिकांसाठी मुळा धरणातून त्वरित आवर्तन सोडावे अशी मागणी केली.

'मुळा धरणातून खरीपासाठी पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने घ्या'
चकाचक निवारा पुन्हा हाती

लवकरच मुळा धरणातून खरीप हंगामातील पिकांसाठी पाणी सोडले जाईल. यासाठी कुठल्याही प्रकारचे आंदोलन अथवा स्टंट करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. पाणी सोडण्याचा निर्णय मार्गस्थ झाला आहे.

अभिजित पोटे (जिल्हाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष)

कार्यकारी अभियंताचे दालनांमध्ये बैठकी दरम्यान प्रहारचे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे यांनी जलसंपदा राज्यमंत्री बच्चु कडू यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवर्तन सोडण्याची निकड मंत्री महोदयांच्या समजावून सांगितली.या चर्चे दरम्यान जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी कार्यकारी अभियंता यांना शासकीय पातळीवर तातडीने निर्णय घेऊन मुळा धरणातून शेतीसाठी तातडीने पाणी सोडण्याची सूचना केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com