सरकारची धोरणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सामान्यांपर्यंत पोहोचवावी - ना.तनपुरे

सरकारची धोरणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने सामान्यांपर्यंत पोहोचवावी - ना.तनपुरे

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राज्यात महाविकास आघाडीचे तीन पक्षाचे सरकार सत्तेवर असून या सरकारची तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे, निर्णय सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाची संघटना महत्वाची असल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काम करावे, असे आवाहन उर्जा नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ओंकार कासार यांनी राज्यमंत्री ना. तनपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील 100 कुटुंबाचा 1 लाख रुपयाचा आरोग्य विमा उतरविला असून त्या विमापत्राचे वाटप तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकारी नियुक्ती पत्राचे वाटपप्रसंगी ना. तनपुरे बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राज्याचे सरचिटणीस आकाश झाबरे होते. यावेळी नगराध्यक्ष अनिल कासार, उपगराध्यक्ष बाळासाहेब उंडे, सूर्यकांत भुजाडी, गजानन सातभाई, अशोक आहेर, संजय साळवे, विजय करपे, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहराध्यक्ष महेश उदावंत, लिगल सेलचे अ‍ॅड.राहुल शेटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव, कंकरभाई शेख उपस्थित होते.

ना. तनपुरे म्हणाले, शहरातील गोरगरीब गरजू कुटुंबांचा 1 लाख रुपयाचा जो आरोग्य विमा काढला, तो अतिशय महत्वाचा आहे. अशा कुटुंबाला आधार देण्याचे काम खरोखर ओंकार कासार व त्यांच्या सहकार्‍यांनी केले आहे. मंत्री झाल्यापासून शहरात 8 ते 10 कोटी रुपयांची कामे झाली आहेत. अजून येत्या काही दिवसात 10 ते 20 कोटी रुपये येताच बरीच कामे मार्गी लागतील. ऑक्टोबर 2021 मध्ये कधीही नगरपालिका निवडणुका जाहीर होतील.

पालिकेत पुन्हा आपलेच बहुमत होऊन सत्ता आपली येणार, यात वादच नाही. असा विश्वास त्यांनी दिला. मागील लोकप्रतिनिधींनी शहरासाठी हायमॅक्स दिले. मात्र, त्याचा वीजबिलाचा खर्च पालिकेला करावा लागला. मी आमदार, मंत्री होताच शहरात तालुक्यात 100 सौर ऊर्जेवर चालणारे प्रदूषणमुक्त हायमॅक्स दिले असून त्याचा पालिकेवर आर्थिक बोजा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संतोष आघाव, नगराध्यक्ष अनिल कासार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अमोल रणसिंग, गोविंद दहिवळकर, भाऊ पोपळघट, गणेश ढोले, अमृत दहिवळकर, विराज उंडे, अक्षय भुजाडी आदी उपस्थित होते. तुकाराम तनपुरे यांनी सूत्रसंचालन तर शहराध्यक्ष ओंकार कासार यांनी आभार मानले.

Related Stories

No stories found.