<p><strong>सुपा l Supa</strong></p><p>ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्रीय कृषी विधेयकाबाबत आंदोलनाचा इशारा दिला असून तेव्हापासून भाजपाचे नेते गॅसवर आहेत. तर दुसरीकडे मागण्या मान्य न झाल्यास ३० जानेवारीचे आंदोलन होणार असल्याचे अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी जाहीर केले आहे.</p>.<p>या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आज अण्णा हजारे यांची भेट घेण्यासाठी राळेगणसिद्धीत दाखल झाले आहे. कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्यासोबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, बबनराव पाचपुतेदेखील उपस्थित आहे.</p>