ना. सत्तार यांचा ताफा शिवसैनिकांनी अडविला

मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पत्रिकेत फोटो नसल्याने तसेच स्थानिक शिवसैनिकांना विश्वासात न घेतल्याने व्यक्त केली नाराजी
ना. सत्तार यांचा ताफा शिवसैनिकांनी अडविला

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

जिल्हा परिषदेचा (Zilla Parishad) कार्यक्रम असतानाही निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा फोटो नाही तसेच शिवसेनेचे मंत्री (Shivsena Minister) कोल्हार (Kolhar) येथे येत असताना स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतलेे नाही, त्यामुळे नाराज झालेल्या शिवसैनिकांनी काल आपल्या पक्षाचे ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Minister of State for Rural Development and Revenue Abdul Sattar) यांच्या वाहनाचा ताफा अडविला.

ना. अब्दुल सत्तार (Minister of State for Rural Development and Revenue Abdul Sattar) यांनी कोल्हार भगवतीपूरमध्ये (Kolhar Bhagwatipur) प्रवेश करताच कमानीजवळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (Shivsena Ravsaheb Kheware), उपजिल्हाप्रमुख अनिल बांगरे (Anil Bangare), तालुकाप्रमुख संजय शिंदे (Sanjay Shinde) तसेच शिवसैनिकांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा अडविला. प्रथमतः त्यांचा सत्कार केला. त्यानंतर जिल्हा परिषदेचा कार्यक्रम असतानाही निमंत्रण पत्रिकेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा फोटो नाही तसेच शिवसेनेचे मंत्री येथे येत असतानादेखील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, स्थानिक पदाधिकारी यांना कोणतीही माहिती नाही. शिवसैनिकांना विश्वासात घेतले गेले नाही याबद्दल नाराजी व्यक्त केली.

भविष्यात जिल्ह्यामध्ये कार्यक्रम असल्यास शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले जाईल असे सांगून ना. सत्तार यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त केली.

यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, जिल्हा उपप्रमुख अनिल बांगरे, राहाता तालुका प्रमुख संजय शिंदे, उपतालुकाप्रमुख सोमनाथ गोरे, विजय गोहर, संतोष जोर्वेकर, युवराज बांगरे, विजय मोरे, गंगाधर बेंद्रे, ज्ञानदेव खोबरे, संजय आहेर, सुयोग सावकारे, आशिष गाडेकर, अक्षय जाधव, आप्पासाहेब खर्डे, पप्पू आत्तार आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com