30 वर्षांची युती तुटली पण विखेंशी माझी 25 वर्षांची मैत्री टिकून - ना. सत्तार

विकासासाठी आमची पक्षविरहित मैत्री- आ. राधाकृष्ण विखे
30 वर्षांची युती तुटली पण विखेंशी माझी 25 वर्षांची मैत्री टिकून - ना. सत्तार

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधील (Congress) 42 आमदारांपैकी आमच्या 17 आमदारांचे नेते हे आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) होते. कोठेही सही करण्यासाठी आमचे पेन रेडी होते. रिक्षा तयार झाली होती. निव्वळ टायर बसवायचे शिल्लक होते. स्टेअरिंग कुणाच्या हातात असावे यावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात एकमत झाले नाही. सेना-भाजपाची (Shivsena-BJP) 30 वर्षांची युती तुटली मात्र विखे पाटलांशी (Radhakrishna Vikhe Patil माझी 25 वर्षांपासूनची दोस्ती टिकून असल्याचे ग्रामविकास व महसूल राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार (Minister of State for Rural Development and Revenue Abdul Sattar) यांनी आवर्जून सांगितले.

कोल्हार भगवतीपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेनेचे मंत्री ना. अब्दुल सत्तार व भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

अब्दुल सत्तार (Minister Abdul Sattar) म्हणाले, मी व विखे पाटील आम्ही दोघे कोणत्याही पक्षात असलो तरी आमची विकासाची विचारधारा एकच आहे. शोले चित्रपटातील ये दोस्ती हम नही तोडेंगे गाण्याप्रमाणे आमची वाटचाल सुरू आहे. करोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन देवालये उघडली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. लोकांची तात्काळ कामे करणारे विखे पा. हे चालते फिरते सरकार आहे. मी टाकलेल्या पावलावर ते आले तर त्यांचे स्वागत आहे. निमंत्रण देण्याचे काम मी केले पुढे निर्णय त्यांचा आहे असे पक्षात सामील होण्याचे सूचक विधान ना. सत्तार (Minister Abdul Sattar) यांनी केले.

आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrishna Vikhe Patil) म्हणाले, राजकारणापलीकडे जाऊन ना. सत्तार (Minister Abdul Sattar) यांच्याशी आपण मैत्री जपली. राजकारणात अस्पृश्यता संपली पाहिजे. सध्या कोणी कोणाच्या संपर्कात आले की चर्चा होते. राजकारणातील काही मंडळी फार कोत्या मनाची आहेत. जिल्ह्यातील काही मंत्री आमच्याकडे पाहत निव्वळ गालात हसत राहतात अशी कोपरखळी त्यांनी ना. बाळासाहेब थोरात (Minister Balasaheb Thorat) यांचा नामोल्लेख टाळून मारली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com