महसूलमंत्री आज घेणार निळवंडे, खंडकर्‍यांच्या प्रश्नांचा आढावा
सार्वमत

महसूलमंत्री आज घेणार निळवंडे, खंडकर्‍यांच्या प्रश्नांचा आढावा

जिल्ह्यातील प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाची माहिती घेणार

Arvind Arkhade

अहमदनगर|(प्रतिनिधी| Ahmednagar

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आज जिल्ह्यातील निळवंडे प्रकल्प प्रलंबित भूसंपादन आणि मोजणी प्रकरणे, कालवाग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्न, खंडकरी यांचे विविध प्रश्न आणि त्यावर करण्यात आलेली कार्यवाही याचा आढावा घेणार आहेत.

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीनंतर महसूलमंत्री थोरात यांच्या उपस्थितीत महसूल विभागाच्या अधिकार्‍यांची सायंकाळी ही बैठक होणार आहे. यावेळी निळवंडे प्रकल्प प्रलंबित भूसंपादन आणि मोजणी प्रकरणे, कालवाग्रस्त शेतकर्‍यांचे प्रश्न यावर चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा भूमिलेख अधीक्षक, जिल्हा पुनर्वसन अधिकारी हे उपस्थित राहणार आहेत.

जिल्ह्यातील प्रस्तावित राष्ट्रीय मार्गावर चर्चा करण्यासाठी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी, नाशिक-पुणे भूमी संपादन लवाद, संगमनेर नगर पालिकेला गायरान जमीन हस्तांतरण, संगमनेर बार असोसिएशनाला वाढ जागा देणे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या इमारतीमध्ये स्थलांतरण करणे आणि खंडकरी यांच्या प्रश्नावर केलेली कार्यवाही याचा आढावा मंत्री थोरात यावेळी घेणार आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com