मुख्यमंत्र्यांनी मंत्री मलिकांचा राजीनामा घ्यावा

आ. राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी
मुख्यमंत्र्यांनी मंत्री मलिकांचा राजीनामा घ्यावा

लोणी | वार्ताहर

केंद्रीय एजन्सीच्या (Central agency) अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केली.

लोणी (Loni) येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे शंभर कोटी लसीकरण (Vaccination) टप्पा गाठून जागतिक विक्रम केल्याबद्दल येथील ग्रामीण रुग्णायातील डॉक्टर व आरोग्य सेवकांचा सत्कार समारंभ शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आ. विखे म्हणाले की, एनसीबी (NCB) या केंद्रीय एजन्सीचे अधिकारी समीर वानखेडे यांना अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी धमकी दिली असून ही अतिशय गंभीर बाब आहे.

राज्यातील एक मंत्री सरकारी अधिकाऱ्याला धमकी कशी देऊ शकतो.मुख्यमंत्री ठाकरे यांनी ना.मलिक यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी करताना त्यांनी तुम्हाला त्यांच्या विषयी काही तक्रार असेल तर न्यायालयात जाणे किंवा इतर मार्ग आहेत, मात्र अधिकाऱ्याचे नाव घेऊन धमकी देणे अतिशय गंभीर आहे.

राज्यात यापूर्वी असे कधी घडलेले नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या वनस्पतींचे समूळ उच्चाटन करण्याची हिंमत दाखवावी. उसाच्या एफ आर पी बद्दल विखे पाटील म्हणाले की,राज्य सरकार स्वतःचे अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवीत असून प्रत्येक बाबतीत केंद्राकडे बोट दाखवण्याची ही नवी पद्धत राज्यात सुरू झाली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com