मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, भाजयुमोची मागणी

संगमनेरात आंदोलन
मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, भाजयुमोची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

मुंबई बॉम्ब ब्लास्ट मधील (Mumbai Bomb Blast) आरोपींच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेणार्‍या मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांनी आपल्या पदाचा राजीनामा (Resigned) द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने (Bharatiya Janata Yuva Morcha) केली आहे. मंत्री मलिक (Minister Nawab Malik) यांच्या विरोधात संगमनेरात (Sangamner) भाजयुमोच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात येवून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढण्यात आली.भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानका (Sangamner Bus Stand) समोर मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची गाढवावरुन धिंड काढून भाजयुमोने तीव्र आंदोलन (Movement) केले.

प्रत्येक तालुक्यात भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी देशद्रोही मंत्री नवाब मलिक यांच्या पुतळ्याचे गाढवावरुन धिंड काढून निषेध (Protest) व्यक्त केला. मंत्री मलिक यांचे ड्रग्ज प्रकरणात स्वतःचे जावई अडकले असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे व आजपर्यंत एसटी कर्मचार्‍यांच्या (ST Workers) 40 पेक्षा जास्त आत्महत्या (Suicide) झाल्या आहे, कर्मचार्‍यांचा संप सुरु आहे. त्यावर न बोलता त्यांच्या मनात एका अधिकार्‍याबद्दल असलेल्या द्वेषापोटी हे सगळे बोलत असतात. तरी त्यांनी असे वागणे सोडले नाही तर त्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे यांनी दिला आहे.

आंदोलनात भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू, जिल्हा सचिव राजेंद्र सांगळे, जिल्हा कोषध्यक्ष केशव दवगे, किरण गुंजाळ, आचार्य डॉ.गुंजाळ महाराज, अरुण शिंदे, कल्पेश पोगुल, हरीश वलवे, संतोष हांडे, अनिल निळे, शिवाजी बाबा आहेर, धनंजय पवार, कोंडाजी कडनर, ओंकार घुगे, विकास गुळवे, अविनाश ओझा, संजय वाकचौरे, अनंत मोकळ, रोहिदास साबळे, वाल्मिक शिंदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com