राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा - जयंत पाटील

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा - जयंत पाटील

नेवासा |तालुका प्रतिनिधी|Newasa

राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) हा सर्व जातीधर्मातील, समाजाला प्रतिनिधित्व देणारा पक्ष आहे. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांसारखे उत्तुंग आणि पितृतुल्य नेतृत्व आपल्या पक्षाकडे आहे. त्यामुळे तालुका-गाव पातळीवर बूथ कमिट्या करून संगठण मजबूत करून राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) पक्ष बळकट करण्यासाठी कामाला लागा असे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (State Water Resources Minister Jayant Patil) यांनी दिले.

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) भेंडा (Bhenda) येथे राष्ट्रवादी परिवार संवाद (Nationalist Family Dialogue) पर्व अंतर्गत कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ना.पाटील (State Water Resources Minister Jayant Patil) बोलत होते. व्यासपीठावर माजी आमदार नरेंद्र घुले पाटील (MLA Narendra Ghule Patil), माजी आमदार चंद्रशेखर घुले (Former MLA Chandrasekhar Ghule) पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Women State President Rupali Chakankar), जिल्हा अध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार पांडुरंग अभंग, अ‍ॅड. देसाई देशमुख, डॉ. क्षितिज घुले पाटील, प्रताप ढाकणे, संदीप वरपे, संजय कोळगे, प्रा.सीताराम काकडे आदी उपस्थित होते.

ना.पाटील पुढे म्हणाले,मागील निवडणुकीत विधानसभेच्या 114 जागा लढविल्या,त्यापैकी 54 जागा मिळाल्या. पराभूत 60 जागांचे काय ? या 60 जागांवर सुधारणा करण्यासाठी सर्व मतदार संघाचा दौरा करण्यात येत आहे. पवार साहेबांसारखे उत्तुंग नेतृत्व पक्षाकडे असतांना ही पक्ष का वाढत नाही असा प्रश्न प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मनाला विचारून पक्षाचा विस्तार कसा वाढविता येईल यासाठी प्रयत्न करावेत. भले कोणी कोणाशी ही आघाडी करू,आपण त्याला मदत करू परंतु आपले सैन्य आणि आपली यंत्रणा तयार ठेवा,गाफील राहू नका.

राज्यात सरकार येऊन दीड पावणे दोन वर्षे झाले,बराच कालावधी कोरोनाचे संकटात गेला,सरकारच्या तिजोरीत पैसे येणे बंद झाले तरी ही सरकारने शेतकऱ्यांचे दोन लाखा पर्यंतची कर्ज माफी केली. आता निसर्गाची अवकृपा होत आहे. अतिवृष्टीचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्याचे एक पीक वाया गेले तर त्याचे सर्व बजेट बिघडते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून सरकार लवकरात लवकर योग्य ती मदत करेल असे ही ना. पाटील यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.