आ.काळेंच्या नियोजनामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येईल : ना. मुश्रीफ

तालुक्यासाठी ऑक्सिजन व औषधांचा पुरवठा करावा: आशुतोष काळे
आ.काळेंच्या नियोजनामुळे रुग्णसंख्या नियंत्रणात येईल : ना. मुश्रीफ

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्यात करोनाचा उद्रेक वाढला असून अहमदनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत करोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे.

महाविकास आघाडी सरकार करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. कोपरगाव येथे आ.काळे यांनी जम्बो कोव्हिड केअर सेंटर सुरू करून बाधित रुग्णांची अडचण दूर केली आहे. त्यांनी केलेल्या उपाययोजना, नियोजन व राबवीत असलेल्या उपक्रमातून कोपरगाव तालुक्यात रुग्णसंख्या लवकरच कमी होईल, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

कोपरगाव येथे आ. काळे यांच्या पुढाकारातून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे सुरू करण्यात आलेल्या जम्बो कोव्हिड सेंटरची पाहणी व करोना बाबतचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री ना.मुश्रीफ कोपरगाव दौर्‍यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जम्बो कोव्हिड सेंटरची पाहणी करून समाधान व्यक्त केले. कृष्णाई मंगल कार्यालय येथे आढावा बैठकीत बोलताना ते म्हणाले, आ. काळे यांनी केलेल्या मागणीचा विचार करून कोपरगाव विधानसभा मतदार संघासाठी ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांचा पुरवठा सुरळीत करून देणार असल्याची ग्वाही दिली.

आ.आशुतोष काळे म्हणाले, तालुक्यात वाढत असलेल्या करोना बाधित रुग्ण संख्येचा विचार करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एस.एस.जी.एम.महाविद्यालयात 100 ऑक्सिजन बेड व महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट येथे 500 बेडचे जम्बो कोव्हिड केअर सेंटर सुरू केले आहे. परंतु ऑक्सिजन व रेमडेसिवीर औषधांची टंचाई जाणवत आहे. यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात ऑक्सिजन व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा कोपरगाव विधानसभा मतदार संघाला करण्यात यावा व कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाला अम्ब्युलन्स मिळावी, अशी मागणी आमदार काळे यांनी केली.

याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक डॉ. मनोज पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.पोखरणा, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक संजय सातव, सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसुंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाते, नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी, डॉ. वैशाली बडदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रशांत वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, अजीज शेख, डॉ. योगेश कोठारी, डॉ. तुषार गलांडे, नारायण लांडगे, निखिल डांगे, चंद्रशेखर म्हस्के, शहरप्रमुख कलविंदर सिंग डडियाल, युवक काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष तुषार पोटे, भरत मोरे, सुनील साळुंके, नितीन शिंदे, अनिल गायकवाड, संतोष गंगवाल उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com