आ. कानडेंच्या पाठीशी आघाडी सरकार भक्कमपणे उभे राहिल - ना. गडाख

आ. कानडेंच्या पाठीशी आघाडी सरकार भक्कमपणे उभे राहिल - ना. गडाख

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आ. लहू कानडे हे सातत्याने मतदारसंघातील प्रश्न मांडत असतात. त्यांच्या सर्व प्रश्नांसाठी मी व ना. तनपुरे त्यांना मदत करणार

असून आघाडी सरकार त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहील, असे आश्वासन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ना शंकरराव गडाख व ना. प्राजक्त तनपुरे यांचे स्वागत आ. लहू कानडे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये करण्यात आले.

ना. गडाख म्हणाले की, श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील जलसंधारणाच्या कामाबाबत तांत्रिक अडचणी आहेत. बीसी नाला, पिंपळाचा सांधा, भैरवनाथनगर येथील कामे तसेच लाख कॅनॉलबाबत लक्ष घालावे.

याप्रसंगी ना. प्राजक्त तनपुरे, आ. लहू कानडे, ज्येेष्ठ नेते इंद्रभान थोरात, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गुजर, जिल्हा काँग्रेस सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे, तालुकाध्यक्ष अरुण पा. नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, सतीश बोर्डे आदी उपस्थित होते.

ना. तनपुरे म्हणाले की, आ. कानडे यांनी विजेच्या प्रश्नाबाबत उपस्थित केलेल्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत करू. तसेच श्रीरामपूर व देवळाली नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

आ. कानडे म्हणाले की, श्रीरामपूर तालुक्यात केवळ 53 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आहे. जवळपास 12500 हेक्टर क्षेत्र पडिक आहे त्यामुळे शासनाच्या नियमात बदल करून श्रीरामपूर तालुक्यातील बीसी नाला, पिंपळाचा सांधा, भैरवनाथ नगर येथील कामे मंजूर करण्याबाबत मदत करावी. वीज वितरणाच्या बाबतीतील अडचणी दूर करण्यासाठी उच्च दाब सबस्टेशनचे काम त्वरीत सुरू व्हावे तसेच वांजुळपोई, उक्कलगाव, घोगरगाव येथील 33/11 केव्हीचे सबस्टेशनचे काम त्वरीत मार्गी लावावे. प्रास्तविक सचिन गुजर यांनी केले. आभार जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले

याप्रसंगी जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष कार्लस साठे, सुधीर नवले, सुरेश पवार, सतीश शेजूळ, बाबासाहेब कोळसे, प्रा. देवरे, नागेश सावंत, अ‍ॅड. समीन बागवान, गोविंद वाघ, दीपक कदम, मदन हारके, अहमद जहागिरदार, बाळासाहेब दोंड आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com