शासनाच्या कृषी अवजारे खरेदी अनुदान योजनेचा लाभ घ्या - ना. गडाख

शासनाच्या कृषी अवजारे खरेदी अनुदान योजनेचा लाभ घ्या - ना. गडाख

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

राज्य शासनाने चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उपअभियान राबविण्याचे ठरविले असून या अभियानाच्या अंमलबजावणीसाठी शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली आहे.

या अभियानाअंतर्गत शेतकर्‍यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शासनाच्या महाडीबीटी, महाआयटीआय या संकेतस्थळावर तालुक्यातील गरजू शेतकर्‍यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन राज्याचे जलसंधारण मंत्री तथा नेवासा लोकप्रतिनिधी नामदार शंकरराव गडाख यांनी केले आहे.

ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अनुदान मर्यादा राहणार असून या योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना गरजेप्रमाणे ट्रॅक्टर, रोटाव्हेटर, पावर टिलर, पेरणी यंत्र, कल्टीवेटर, ट्रॅक्टर फवारणी यंत्र, मळणी यंत्र, मोगडा, पाचट कुट्टी, रिपर बाईंडर, मल्चर आदी अवजारांची नोंदणी करता येईल. नेवासा तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी नोंदणी करून अनुदानावर आधारित या योजनेत सहभाग घ्यावा असे आवाहन ना. गडाख यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com