नेवासा-नगरमधील उद्योग वाढीसाठी ना. गडाखांनी केली उद्योगमंत्र्यांशी चर्चा
सार्वमत

नेवासा-नगरमधील उद्योग वाढीसाठी ना. गडाखांनी केली उद्योगमंत्र्यांशी चर्चा

Arvind Arkhade

नेवासा|तालुका प्रतिनिधी|Newasa

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुंबई येथे राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन अहमदनगर, उस्मानाबाद जिल्ह्यासह नेवासा तालुक्यात उद्योग व रोजगार वाढीबाबत चर्चा केली.

सोमवार दि.10 ऑगस्ट रोजी मंत्री शंकरराव गडाख यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. विशेषतः नगर शहरातील एमआयडीसीसह संपूर्ण नगर जिल्ह्यातील तसेच नेवासा तालुक्यातील पांढरीपूल येथील एमआयडीसी बाबत सविस्तर चर्चा केली.

नगर व पंढरीपूल एमआयडीसी मधील काही उद्योग-कंपन्या सध्या बंद आहेत. काही कंपन्यांपुढे छोट्या छोट्या अडचणी आहेत त्या सोडविल्या तर त्या कंपन्या सुरू होतील आणि स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल.

त्यामुळे बंद कंपन्या सुरू करणे, आणखी काही नवीन उद्योग वाढीसाठी व रोजगार निर्मितीकरिता प्रोत्साहन देण्यासाठी आपण विशेष लक्ष घालावे अशी मागणीही ना. गडाख यांनी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com