उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं - केसरकर

अजित पवारांचे तोंड भरून कौतुक
उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं - केसरकर

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पैशाने प्रेम विकत घेता येत नाही. प्रेमाने मन जिंकावे लागते, जेव्हा घराला आग लागते तेव्हा अगोदर आग विझवावी लागते अनेकजण आपल्याला सोडून गेले याचे आत्मपरीक्षण उद्धवजींनी करावे, असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी करीत विरोधी पक्षनेते अजित पवारांचे मात्र त्यांनी तोंड भरून कौतुक केलं आहे.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज रविवारी साईदर्शन घेऊन नववर्षाची सुरूवात केली.दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना केसरकर म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मरक्षक आणि स्वराज्यरक्षक देखील आहेत. त्यांनी यातना सोसल्या मात्र धर्म नाही बदलला. शब्दछल करण्यात काही महत्त्व नाही. विरोधी पक्षनेते अजीत पवार हे बाहेरून कठोर असले तरी त्यांचं मन मात्र निर्मळ आहे. बोलताना फटकळ बोलतील मात्र विरोधी पक्षनेता कसा असावा तर अजीतदादांसारखा असावा अशा शब्दांत दीपक केसरकर यांनी अजित पवारांचं कौतुक केले.

उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आदर असून कटूता कमी करणे उद्धवजींच्या हातात आहे. जेव्हा घर पेटते तेव्हा अगोदर आग विझवावी लागते, कशामुळे लागली ते नंतर बघू . अगोदर आपण आपलं घर सुरक्षित ठेवू असे मी उद्धवजींना बोललो होतो. मला ते बोलले त्याच दु:ख वाटल नाही पण जे काही माध्यमात दाखवलं गेलं त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या. प्रेमाचा आदर आहे तो कमी होता कामा नये.

मी सगळ्यांचे उत्तर देईल. त्यांच्या आजूबाजूची लोक जे सांगतात त्यावर ते मत बनवत असतात. पैशाने प्रेम विकत घेता येत नाही तर प्रेमाने मन जिंकावं लागतं शिंदेंनी 40 आमदारांची मने जिंकली. एक दोन दिवसात उत्तर देईल. निश्चित काहीतरी घडलं त्यामुळे अनेकजण पक्ष सोडून गेले. मी जसं आत्मपरीक्षण केलं तसं उद्धवजींनी कराव असा सल्ला केसरकर यांनी उद्धव ठाकरेंना दिलाय.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com