कडक लॉकडाऊनसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आवाहन
कडक लॉकडाऊनसाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

लोकसहभाग व प्रशासनाच्या समन्वयातून बोटा व चंदनापुरी येथे झालेले कोव्हिड केअर सेंटर हे इतरांसाठी आदर्शवत असून करोना किंवा इतर कोणत्याही आजाराचे लक्षणे असले तरी त्या व्यक्तीला तातडीने स्वतंत्र ठेवा.

करोनाची साखळी तोडण्यासाठी निर्बंधांचे कडक पालन करणे गरजेचे असून प्रत्येक गावात तरुणांनी पुढाकार घेत ग्राम आरोग्य सुरक्षा समिती अधिक कार्यक्षम बनवून गावोगावी लॉकडाऊनचे निर्बंध कडक पद्धतीने राबवा, असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

चंदनापुरी, आंबी दुमाला, बोटा येथे कोव्हिड केअर सेंटरची पाहणी व नागरिकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी समवेत आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, मिलिंद कानवडे, आर. बी. रहाणे, विजय राहणे, तुळशीनाथ भोर, सुहास आहेर, सुहास वाळुंज, बाळासाहेब ढोले, विकास शेळके, संतोष शेळके, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.

नामदार थोरात यांनी चंदनापुरी व बोटा येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये जाऊन रुग्णांची चौकशी करत त्यांना धीर दिला, यावेळी विविध सुविधांची पाहणी केली.

अजय फटांगरे यांनी बोटा येथील कोव्हिड केअर सेंटर व त्यामध्ये मदत करणार याची माहिती दिली तर चंदनपुरी येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये शिक्षकांनी केलेल्या कामाची माहिती मिलिंद कानवडे यांनी दिली. भेटीमध्ये नामदार थोरात यांनी ग्रामआरोग्य सुरक्षा समितीच्या सदस्यांशी संवाद साधून घरोघर तपासणीसाठी येणार्‍या अडचणी समजून घेत काही सूचना केल्या.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com