महसूलचा कारभार पारदर्शी व्हावा

मंत्री बाळासाहेब थोरात || नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावा
महसूलचा कारभार पारदर्शी व्हावा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

सरकारची बांधीलकी जनतेशी आहे. महसूल विभागाचा कारभार अधिक गतीमान व पारदर्शक करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करा. सर्वसामान्य नागरिकांना चांगली सेवा मिळते तेव्हा सरकार चांगले आहे, याची प्रचिती येते. तेव्हा सर्वसामान्य माणसाला चांगली सेवा देण्याचे काम झाले पाहिजे, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

अहमदनगर जिल्हा प्रशासनाची नवी प्रशासकीय इमारत जनतेच्या सेवेत दाखल झाली, यावेळी ना.थोरात बोलत होते. यावेळी जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री राहिबाई पोपेरे, जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले पाटील, खा.सदाशिव लोखंडे, आ.बबनराव पाचपुते, आ.डॉ.सुधीर तांबे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, मधल्या पाच वर्षांत इमारतीचे काम बंद होते.

पुन्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महसूलमंत्री झालो आणि पहिल्या आठ दिवसांत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत 20 कोटी मंजूर केले. दरम्यान, कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा प्रशासनाचे अत्यंत ढिसाळ नियोजन दिसून आले. राष्ट्रवादीचा एकही मंत्री किंवा आमदार कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत.

योगायोगाचे दुसरे नाव...

इमारत पायाभरणी व लोकार्पण ना.थोरात यांच्या हस्ते होत आहे. योगायोगाचे दुसरे नाव ना.थोरात आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालले तर मला देखील चांगले काम करता येईल, असे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख म्हणाले.

नागरिकांना हेलपाटे नको

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रेकॉर्डेड संदेश पाठवला होता. शासकीय इमारतीतील लिफ्ट कधीच व्यवस्थित नसते, असा अनुभव आहे. त्यामुळे इमारत देखभाल व्यवस्थित करा. प्रश्न घेवून येणार्‍या नागरिकांवर हेलपाटे मारायची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्या, असेासंदेश त्यांनी महसूल अधिकार्‍यांना दिला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com