कांताबाई सातारकर यांचे सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान - ना. थोरात

कांताबाई सातारकर यांच्या निधनाने कलाक्षेत्राची अपरिमीत हानी- आ. विखे
कांताबाई सातारकर यांचे सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान - ना. थोरात
minister Thorat

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

माशा सह लोककला क्षेत्रात आपले आयुष्य वेचणार्‍या कांताबाईंनी कलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात भरीव असे मोठे योगदान दिले असून त्यांच्या निधनाने लोककला क्षेत्रातील एक तपस्वी व्यक्तिमत्व हरपले असल्याची आदरांजली महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

कांताबाई सातारकर यांनी संगमनेरचे नाव राज्य पातळीवर पोहोचवले. तमाशा ही महाराष्ट्राची प्रमुख लोककला असून अनेक गेली 50 वर्ष या लोककलेच्या माध्यमातून कांताबाईंनी महाराष्ट्रातील जनतेची सेवा केली. महाराष्ट्रभर फिरत असताना त्यांनी संगमनेरची वैभवशाली परंपरा कायम जोपासली. आपल्या भरदार अभिनयाने त्यांनी अनेक भूमिका गाजविल्या. रायगडची राणी, डोम्या नाग, कलंकिता मी धन्य झाले, महारथी कर्ण, हरिश्चंद्र तारामती, विशाल गड ची राणी, कोंढाण्यावर स्वारी असे विविध वगनाट्य त्यांचे अजरामर ठरल्याचे ना. थोरात म्हणाले.

कांताबाई सातारकर यांच्या निधनाने कलाक्षेत्राची अपरिमीत हानी - आ. विखे

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती कांताबाई सातारकर यांच्या निधनाने कलाक्षेत्राची अपरीमीत हानी झाली आहे. पारंपरिक कलेची जोपासना करणार्‍या तमाशा सम्राज्ञीस महाराष्ट्र मुकला असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

आपल्या शोकसंदेशात आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, अतिशय खडतर आणि संघर्षमय आशा वाटचालीतून तमाशा कलेची जोपासना करून कांताबाईनी अवघ्या ग्रामीण महाराष्ट्राला आनंद मिळवून देताना स्वतःचे दु:ख कधी जाणवू दिले नाही.

कांताबाईसह कुटुंबियांनी या कला क्षेत्रात स्वतःला झोकून देताना सहकारी कलावंताना कौटुंबिक मायेने त्यांनी आधार दिला. पारंपरिक कलेला जिवंत ठेवण्याचे केलेले काम नगर जिल्ह्याचा नावलौकीक वाढविण्यास कारणीभूत ठरले. कलाक्षेत्रातील त्यांच्या या योगदानाचा गौरव म्हणून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील राज्यस्तरीय कलागौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्याचे भाग्य प्रवरा परीवाराला मिळाल्याची आठवण आ. विखे पाटील यांनी आवर्जून सांगितली.

लोककला क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शिका हरपल्या - आ. सुधीर तांबे

गेली 50 वर्ष तमाशा या लोककलेच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार्‍या कांताबाई सातारकर यांनी वगनाट्यातून अनेक पुरुषी भूमिकाही साकारल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार्‍या या ज्येष्ठ व्यक्तिमत्वाने कायम सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान दिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे संगमनेर करांसाठी कायम भूषणावह राहिले. त्यांच्या निधनाने तमाशा व लोककला क्षेत्राची मोठी हानी झाली असून या क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शिका हरपली असल्याची भावना आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी व्यक्त केली आहे.

लोककलावंतांची आई हरपली - सौ. तांबे

श्रीमती कांताबाई सातारकर या संगमनेरकरांसाठी कायम भूषण होत्या. आमच्या दोन्ही परिवारांचे त्यांच्या बरोबर कायम जिव्हाळ्याचे संबंध राहिले. कांताबाईंचा राज्य पातळीवर होणारा गौरव हा संगमनेरकरांचा गौरव होता. त्यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी नामदार थोरात यांनी शतकपूर्ती व्हावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली होती. मात्र नियतीला ते मान्य नव्हते. त्यांच्या निधनाने लोककला क्षेत्रातील अनेक कलावंतांची आई हरपली असल्याची भावना नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com