दिपावली सणातून प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य व आनंद निर्माण व्हावा - ना. थोरात

दिपावली सणातून प्रत्येकाच्या जीवनात चैतन्य व आनंद निर्माण व्हावा - ना. थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

दिपावलीचा सण संपुर्ण देशात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीत या सणाचे विशेष महत्व असून घरोघरी पेटवली जाणारी पणती अंधार दूर करून प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचा प्रकाश निर्माण करते. मागील दोन वर्षात करोनासह विविध संकटे आली. आता ती दूर होऊन पुन्हा प्रत्येकाच्या जिवनात चैतन्य व आनंद निर्माण व्हावा अशा शुभेच्छा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या आहेत.

अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांमध्ये नामदार थोरात यांच्या उपस्थितीत लक्ष्मीपूजन करण्यात आले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी समवेत अ‍ॅड. माधवराव कानवडे, रणजितसिंह देशमुख, कॅन्सर तज्ञ डॉ. हसमूख जैन, डॉ. जयश्री थोरात, बाबासाहेब ओहोळ, लक्ष्मणराव कुटे, अमित पंडित, गणपतराव सांगळे, आर. एम. कातोरे, संतोष हासे, हौशीराम सोनवणे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, चिफ अकाऊटंट अमोल दिघे, संदीप दिघे, किरण कानवडे आदि उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा बँक, अमृतवाहिनी बँक, राजहंस दूध संघ, शॅम्प्रो, हरिश्चंद्र फेडरेशन येथेही लक्ष्मीपूजन करण्यात आले तर कारखाना कार्यस्थळावर श्री. व सौ. राऊत यांचा भजन गायनाचा कार्यक्रम झाला.

यावेळी ना. थोरात म्हणाले, भारतीय संस्कृतीत दिपोत्सव म्हणून साजरा होणार्‍या सणात लहान थोर सर्व आनंदाने सहभागी होतात. राज्यात यावर्षी करोनाचे संकट आहे. या दिवाळीत करोना कायमचा नष्ट होऊन पुन्हा एकदा सर्वांना मोकळे जीवन जगता यावे ही प्रार्थना आहे. मागील वर्षात अनेक संकटे आली. यापुढे ती येऊ नये व प्रत्येकाला पुन्हा एकदा आनंदी जीवन जगता यावे. अमृत उद्योग समूहाने सर्वसामान्यांच्या विकासाकरिता काम करत अत्यंत चांगली वाटचाल केली असून तालुक्यातील जनतेच्या जिवनात आनंद निर्माण केला आहे.

कारखान्याने कार्यक्षेत्रात 200 प्रति टन प्रोत्साहनपर अनुदान दिले असून 20 टक्के बोनस दिला आहे. दूध संघाने दिवाळी निमित्त शेतकर्‍यांना रिबेट दिले असून संगमनेरची बाजारपेठ फुलली आहे. दीपावली निमित्त सर्वांनी करोनाचे नियम पाळावेत असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चिफ अकाऊटंट अमोल दिघे यांनी केले तर आभार कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी मानले.

दीपावली प्रकाशातून आनंद निर्माण करणारा सण - आ. तांबे

दीपावली हा प्रकाशातून आनंद निर्माण करणारा सण आहे. भारतीय संस्कृतीत या सणाचे महत्त्व मोठे असून सर्वांनी एकत्र येऊन हा सण साजरा करावा. एकमेकांच्या जिवनात आनंद निर्माण करतांना समृध्द कुटुंबाच्या उभारणीबरोबर समृध्द देशाच्या उभारणीतही सहभाग द्यावा. ही दीपावली सर्वांना आनंदमय व भरभराटीची जावो. अशा शुभेच्छा नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com