लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले म्हणून निष्काळजीपणा नको - ना.थोरात

लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले म्हणून निष्काळजीपणा नको - ना.थोरात

संगमनेर |प्रतिनिधी| Sangmner

करोना हा अदृश्य शत्रू आहे. तो कोणत्याही रुपाने मानवी शरीरात प्रवेश करतो. दुसर्‍या लाटे नंतर लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाले असले तरी कोणीही निष्काळजीपणा करू नका, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे तालुका व शहरातील करोना आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, जि प सभापती सौ. मिराताई शेटे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, जि. प. सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, मिलिंद कानवडे, महेंद्र गोडगे, सिताराम राऊत, निखिल पापडेजा, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गट विकास अधिकारी सुरेश शिंदे, डॉ. संदीप कचोरिया, डॉ. राजकुमार जर्‍हाड, डॉ. सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, सुनील पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी नामदार थोरात म्हणाले, संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा असून करोनाची रुग्ण वाढ कमी होते आहे हे आनंददायी आहे. मात्र लॉकडाऊनच्या शिथीलते नंतर होणारी गर्दी अत्यंत चिंताजनक आहे. करोना अद्याप संपलेला नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते तिसरी लाट येऊ शकते म्हणून प्रत्येकाने शासकीय नियमांचे पालन केले पाहिजे. कोणाला लक्षणे आढळली तर तातडीने वैद्यकीय अधिकार्‍यांचा सल्ला घ्या. लक्षणे असणार्‍यांचे विलगीकरण करा. ट्रेसिंग, टेस्टिंग, आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीचा वापर करून जास्तीत जास्त गावे पूर्ण मुक्त करण्यासाठी सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे.

संगमनेर तालुक्यात सध्या 81 गावे करोना मुक्त झाली असून संपूर्ण तालुका लवकरात लवकर करोना मुक्त करण्यासाठी सर्वांनी निर्बंध शिथिल झाले असले तरी अत्यंत काळजी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी तालुक्यातील करोना परिस्थितीचा आढावा सांगितला. तर मिलिंद कानवडे यांनी महाविकास आघाडी सरकारने नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना तीन लाखापर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज दिल्याबद्दल महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा अभिनंदनाचा ठराव व नगरपालिकेला स्वच्छतेच्या कामाबद्दल पर्यावरण विभागाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात अभिनंदन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com