महसूलमंत्री ना. थोरातांची बाबासाहेब दिघेंच्या निवासस्थानी अचानक बैठक

पक्ष बळकटीकरणासाठी कार्यकर्त्यांना दिला मूलमंत्र
महसूलमंत्री ना. थोरातांची बाबासाहेब दिघेंच्या निवासस्थानी अचानक बैठक

टिळकनगर |वार्ताहर| Tilaknagar

ना. बाळासाहेब थोरात यांनी दत्तनगर येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रम आटोपून बाबासाहेब दिघे यांच्या निवासस्थानी अचानक बैठक घेवून जवळच्या कार्यकर्त्यांसमवेत तालुक्यातील विविध प्रशांवर चर्चा करून काँग्रेस पक्ष बळकटीकरणासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने एकत्र येण्याचा मूलमंत्र देत शासन स्तरावरील विविध योजना तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. त्यास उपस्थितांनी प्रतिसाद दिला.

राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी नुकत्याच श्रीरामपूर तालुका दौर्‍यादरम्यान भारतरत्न डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागताला आ. लहु कानडे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थांनचे विश्वस्त सचिन गुजर, संजय छल्लारेसह शेकडो कार्यकर्त्यांनी नियोजन मंडळाचे सदस्य बाबासाहेब दिघे यांच्या घरी उपस्थित होते. त्यावेळी ना. थोरात यांनी आ. कानडे, करण ससाणे, सचिन गुजर, दिघेसह जवळच्या कार्यकर्त्यांसमवेत तालुक्यातील विविध प्रशांवर चर्चा करून काँग्रेस पक्ष बळकटीकरणासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने एकत्र येण्याचा मूलमंत्र दिला.

जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य दिघेंनी श्रीरामपूर एम.आय.डी.सीला चालना मिळावी तसेच खंडकरी शेतकर्‍यांच्या उर्वरित जमीन वाटप प्रश्न निकाली काढून तालुक्यातील पाणी, वीज, रस्त्यासह विविध प्रश्न शासन स्तरावर सोडवण्यासाठी ना. थोरात यांच्याकडे विनवणी केली. तर आ. कानडे यांनी तालुक्याच्या विविध प्रश्नांवर ना. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शासन दरबारी सतत प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली.

बैठकीत ना. थोरातांनी आपल्या राजकीय जीवनात सुरुवातीपासून श्रीरामपूर तालुक्यातील जनतेने काँग्रेस पक्षाला बळकटीकरण देऊन पक्षाला कौल दिला आहे. याची परतफेड म्हणून नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी एकनिष्ठपणे हेवेदावे न करता काँग्रेस पक्षाला बळकटीकरण द्यावे असे आवाहन केले.

बैठकी दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचा अंतर्गत गटबाजीचा विषय चव्हाट्यावर दिसून आला. मात्र बैठकीत श्रीरामपूरच्या नेते मंडळींनी ना. थोरातसह एकमेकांशी दिलखुलास गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला तर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. पक्षात कुठल्याही प्रकारची गटबाजी नसल्याचे प्राथमिक निदर्शनास आल्याने जमलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावर समाधान दिसून आले.

बैठकी दरम्यान जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आशाताई दिघेंनी ना. थोरात, आ. कानडे, करण ससाणे, सचिन गुजर, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, आदी मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन कौटुंबिक स्वागत करून सत्कार केला.

Related Stories

No stories found.