आकारी पडीत जमीन प्रश्नाबाबत सरकार शेतकर्‍यांच्या बरोबर

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन
आकारी पडीत जमीन प्रश्नाबाबत सरकार शेतकर्‍यांच्या बरोबर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शासनाने खंडकरी व आकारी पडीत जमीन मुळ शेतकर्‍यांना देण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलेला असून खंडकरी जमीन वाटप प्रक्रिया चालू असून

5-10 % काम शिल्लक आहे. मागील 5 वर्षात या विषयात कुठलीच प्रगती झाली नसून परंतु या आकारी पडीत जमीन प्रश्नाबाबत सरकार शेतकर्‍यांच्या बरोबरच असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

तालुक्यातील हरेगाव मळ्यातील 7365 एकर आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आ. लहू कानडे व उपनगराध्यक्ष करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली. त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सुरेश ताके यांनी आकारी पडीत जमिनीच्या प्रश्नाबाबत शेतकर्‍यांची बाजू मांडली.

महसूल मंत्री झाल्यामुळे या अन्यायग्रस्त आकारी पडीत शेतकर्‍यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत त्यामुळे हरेगाव मळ्यातील निविदा प्रक्रिया त्वरित थांबवा व शेतकर्‍यांना जमीन वाटप करा, याबाबत शेतकर्‍यांच्यावतीने आम्ही करत असल्याचे विनंती निवेदन देत मागणी केली.

आकारी पडीत शेतकर्‍यांची जमीन इंग्रज सरकारने साखर कारखाना काढण्यासाठी घेतली असून ही जमीन पडीत नव्हती ना तिचा आकार थकलेला होता. ही जमीन जबरदस्तीने विनामोबदला बळकवलेली आहे. आज सदर जमीन शेतकर्‍यांना देण्यासंदर्भात उच्च न्यायालयात 2005 मध्ये शासनाने शपथपत्र देऊनही अद्याप जमीन शेतकर्‍यांना मिळालेली नाही.

20 तारखेला तुमचा(आकारी पडीत शेतकर्‍यांचा) मेल आला आमदार कानडे तसेच करण ससाणे यांचा फोन आल्यानंतर हरेगाव फॉर्मची निविदा प्रक्रिया तातडीने थांबवली असल्याचे सांगितले.

या चर्चेत आ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, करण ससाणे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर, अरुण पाटील, सुधीर नवले यांचेसह आकारी पडीत शेतकरी दिलीप गलांडे, सुरेश ताके, भरत आसने, शेखर आसने, विठ्ठल आसने, योगेश आसने आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com