भुकेलेल्याची भूक भागविणे पुण्याचे काम- ना. बच्चु कडु

भुकेलेल्याची भूक भागविणे पुण्याचे काम- ना. बच्चु कडु

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

अन्नछञ इतर वेळी सर्वत्र चालुच असतात. भूक नसतानाही अन्नछञ चालवले जातात. मात्र सध्या करोना महामारीमुळे देवस्थान, धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. करोनामुळे लॉकडाऊनमुळे अनेक गरजुंची उपासमार सुरू आहे. त्या भुकेलेल्यांना दोन घास देण्याचे काम येथे गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. हे सर्वार्थाने पुण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन प्रहार जनशक्तीचे संस्थापक अध्यक्ष ना. बच्चु कडु यांनी येथील गरीब थाळी अन्नछत्राला दिलेल्या शुभेच्छा भेटी प्रसंगी केले.

याप्रसंगी राज्य उपाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे, कृष्णा सातपुते, ज्ञानेश्वर सांगळे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

टाकळीभान येथे प्रहारचे जिल्हा कार्याध्यक्ष नवाज शेख व भाजपाचे युवा तालुका उपाध्यक्ष नारायण काळे यांनी गेल्या महिनााभरापासुन लोकसहभागातून मोफत गरीब थाळी अन्नछत्र सुरू केले आहे. 28 हजारांपेक्षा जास्त गरजुंनी या अन्नछञाचा आतापर्यंत लाभ घेतला आहे. ना. बच्चु कडु यांनी काल मंगळवारी या अन्नछत्राला सदिच्छा भेट दिली. यावेळी ते म्हणाले, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव या काळात व धार्मिळ स्थळांवर नेहमीच अन्नदान सुरू आसते. त्यावेळी पोटात भूक नसतानाही ते अन्नदान केले जाते.

माञ आज करोनामुळे सर्व काही थांबलेलं आहे. गरजुंची उपासमार होत आहे. त्यांची पोटाची भूक भागविण्यासाठी आज खर्‍याअर्थाने अन्नछत्राची गरज आहे. ती गरज ओळखून या दोन तरुणांनी गेल्या महिन्याभरापासून सुरु केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. आजपर्यंत 28 हजारांपेक्षा जास्त गरजुंनी या थाळीचा लाभ घेतला असल्याने भुकेल्या पोटासाठी हे खर्‍या अर्थाने तिर्थक्षेत्र ठरले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी उपसरपंच कान्होबा खंडागळे, ग्रा. वि. अधिकारी रामदास जाधव, तालुकाध्यक्ष रघुनाथ शिंदे, विलास सपकळ, भोकरचे शाखाध्यक्ष रमेश भालके, डा. किसन शिंगोटे, अकिल शेख, गुरुनाथ चव्हाण, रमेश पेहरकर , बंटी मगर, दीपक पटारे, बाळासाहेब ढंगारे, मुकुंद लोखंडे, अक्षय थोरात, ऋषी धोंडलकर, अरुणा काळे, छाया लोखंडे, सलिमा शेख, कैलास चव्हाण, नानासाहेब तागड आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com