किमान वेतन कायद्याप्रमाणे मासिक वेतन द्या

संगणक परिचालक संघटनेचे गट विकास अधिकार्‍यांना निवेदन
किमान वेतन कायद्याप्रमाणे मासिक वेतन द्या

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्यावतीने ग्रामपंचायतीमधील आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पातील संगणक परिचालक यांना यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत सुधारित आकृतीबंधामध्ये लिपिक पदावर नियुक्ती देऊन किमान वेतन कायदा 1948 नुसार मासिक वेतन मिळावे या मागणीचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाच्या ग्रामविकास खात्याअंतर्गत 2015 पर्यंत संग्राम प्रकल्प राबविण्यात आला. 2016 पासून सध्या कार्यान्वित ग्रामविकास विभाग व माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या अधिनस्त आपले सरकार सेवा केंद्र या नावाने अंमलबजावणी होत आहे. राज्य शासनाने संग्राम प्रकल्पात आणि सध्या आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पात कार्यरत असलेले संगणक परिचालक यांची तुटपुंजे मानधनात म्हणजे फक्त 6930 प्रती महिना नियुक्ती केली आहे. महागाईच्या काळात हे मानधन अत्यल्प व तेही अवेळी मिळत असल्याने संगणक परीचालकांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

ग्रामपंचायतीमध्ये संगणक परीचालकांना ठरवलेल्या व्यतिरिक्त अनेक ऑनलाईन व ऑफलाईन कामे दिली जातात. शासकीय नियमात नसताना त्यांना निवडणुकीची कामे दिली जातात. हा संगणक परीचालकांवर अन्याय आहे. या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र संगणक परिचालक संघटना हिवाळी अधिवेशनात आंदोलन करत आहे. या आंदोलनाला पाठींबा म्हणून निवेदन जसण्यात येत असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

यावेळी विस्तार अधिकारी श्री. चर्‍हाटे, अभंग, संघटनेचे अध्यक्ष श्रीराम फरगडे, तालुकाध्यक्ष सुनील कचरे, उपाध्यक्ष अभिजित थोरात, सचिव किसन इंगळे, सुधीर तुपे, किरण भालदंड, नवनाथ वाघमारे, संदीप खुरूद, राम त्रिभुवन, संदीप धिवर, शर्मा, रवींद्र दवंगे, भारत वारुळे, राहुल म्हस्के, अमोल ठोकळे, सुजित मोटकर, सुनील खेमनर, सुनील रोकडे, जयश्री गडकरी, अपर्णा कातोरे, वर्षा सगळे, शुभदा शिंदे, रेखा काळे, मनीषा पिंपळे, राजेश कुहिले, एकनाथ कुसेकर, जाकीर पटेल, संदीप आढाव, सोएब शेख आदींसह संगणक परिचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com