दुधाचा टँकर पळवून नेणार्‍या आरोपीस पंजाबमध्ये अटक

दुधाचा टँकर पळवून नेणार्‍या आरोपीस पंजाबमध्ये अटक

श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

प्रभात डेअरी परिसरातून दुधाचा टँकर अपहरण करून पळून नेणार्‍या आरोपीस तब्बल तीन वर्षांनंतर श्रीरामपूर शहर पोलिसांनी थेट पंजाब राज्यात जाऊन सापळा रचून अटक केली.

श्रीरामपूर शहरातील बाभळेश्वर रस्त्यावर असलेल्या प्रभात डेअरी परिसरातून दुधाचा टँकर अपहरण करून पळवून नेण्यात आला होता. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांत गुन्हा रजिस्टर नं. 398/2018 प्रमाणे भा.दं.वि. कलम 394, 163, 34 प्रमाणे गु.र.नं.398 2018 दाखल करण्यात आला होता.

प्रभात डेअरी परिसरात सीसी फुटेजचा बारकाईने तपास करून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू त्रिभुवन, पोलीस कॉन्स्टेबल अत्तार शेख, पोलीस कॉन्स्टेबल हिवाळे यांनी पंजाबमध्ये जाऊन सापळा रचून हॅप्पी नावाच्या या गाडी चालकास पकडले. त्याने दुधाचा टँकर चोरल्याचे समोर येत आहे.

या आरोपीस पोलीस आज न्यायालयासमोर हजर करणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक़ मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक डॉ. दिपाली काळे, डीवायएसपी संजय मिटके पो.नि.सानप यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी पंजाबमध्ये जाऊन ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com