दूध दर वाढीसाठी आज भाजपाचे जिल्ह्यात आंदोलन- गोंदकर
सार्वमत

दूध दर वाढीसाठी आज भाजपाचे जिल्ह्यात आंदोलन- गोंदकर

Arvind Arkhade

शिर्डी|शहर प्रतिनिधी|Shirdi

गाईच्या दुधाला सरसकट प्रति लिटर दहा रुपये अनुदान द्या, दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्या व दूध खरेदीचा दर प्रतीलिटर 30 रुपये करा या प्रमुख मागण्यासाठी जिल्हाभर रास्तारोको, दूध संकलन केंद्र समोर निषेध अशा विविध पद्धतीने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.

प्रमुख मागण्यासाठी जिल्हाभर रास्तारोको तसेच निषेध व्यक्त करत विविध पद्धतीने आंदोलन करण्यात येणार आहे असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी सांगितले.

या आंदोलनाचे नियोजन व्हर्च्युअल बैठकीद्वारे करण्यात आले आहे. हे आंदोलन आ. राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड, स्नेहलताताई कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे यांच्या नेतृत्वातखाली जिल्हाभर होणार आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com