दूध आंदोलन शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक -शेळके
सार्वमत

दूध आंदोलन शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिक -शेळके

Arvind Arkhade

पुणतांबा|वार्ताहर|Puntamba

राज्यात दूध दरवाढीवरुन राजकारण तापले आहे. दुधाच्या दर वाढीसाठी शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांनी नुकतेच आंदोलन केले आहे. शेतकरी संघटनेच्या दूध दर आंदोलनाला सांगली जिल्ह्यातून सुरुवात झाली.

दूध दरवाढीचा तिढा राज्यात कायम आहे असे असताना अमेरिकी डेअरी उद्योगाला देशाची बाजारपेठ खुली करण्याचा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय रद्द करणे गरजेचे आहे, अशी मागणी करून दुध धंदा आणि शेतकरी सरकार यांचे वास्तव आशा केंद्राचे कार्यकारी विश्वस्त सुरेश शेळके यांनी स्पष्ट केले

दूध आंदोलनावरून सध्या राजकारण चांगलेच तापलेले आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दर वाढीसाठी राज्यभर आंदोलनाची हाक दिली. गायी आणि म्हशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपये वाढ मिळावी, केंद्र सरकारने दूध भुकटी आयात निर्णय बदलावा, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारण्यात आलेले आहे.

या आंदोलनाची सुरुवात आक्रमक पद्धतीने झाली. राज्यात दूध दरवाढीचे आंदोलन सुरू असतांनाच केंद्र सरकारने अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनासाठी देशाची बाजारपेठ खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दूध उत्पादकांना मोठं नुकसान होणार असल्याने राज्याच्या दुग्ध उद्योग क्षेत्रातून टीका होत आहे.

अशा सगळ्या अडचणीत आपल्या देशाची अर्थव्यवस्था, येथील शेतकरी, दूध उत्पादक यांना आत्मनिर्भर होण्यासाठी सरकारने मदत करणे अपेक्षित आहे पण सरकारचे धोरण याउलट दिसून येते. अमेरिकन दूध डेअरी भारतात आली की, येथील दूध व्यावसायिक राहिला साहिलाही पुरता कोलमडुन जाईल म्हणून सरकारने अमेरिकेसोबत केलेले आयात धोरण रद्द करणे गरजेचे आहे. असे सुरेश शेळके यानी स्पष्ट केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com