दुध भेसळ न थांबल्यास आंदोलन - जगताप

दुध
दुध

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

संपूर्ण महाराष्ट्रात संकलन होणारे दूध एकाच ठिकाणी सकाळ संध्याकाळी दोन वेळा संकलित करण्यात यावे, दूध भेसळ नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी यासह राशीन येथील श्री जगदंबा देवी देवस्थानची जागा सरकारी रेकॉर्डप्रमाणे मोजून कंपाऊंड करावे अशा मागण्या करत शासनाने या सर्व प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अन्यथा 26 मे पासून राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरासमोर आमरण उपोषण करणार असल्याचे जगदंबा दूध संकलन केंद्राचे प्रमुख नारायण जगताप यांनी स्पष्ट केले आहे. जगताप यांनी पत्रकार परिषदेत हा इशारा दिला आहे.

जगताप म्हणाले, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दुधात भेसळ होत असून यामुळे सर्वसामान्य मुलांना आपण दूधरुपी विष पाजत आहोत. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दूध भेसळ नियंत्रण कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील सात तालुक्यात फक्त दिवसातून एकदा सकाळी दूध संकलन केले जाते, रात्री शेतकर्‍यांनी काढलेल्या दुधात सकाळपर्यंत लाखो बॅक्टेरिया तयार होतात त्यामुळे सर्वत्र दिवसातून सकाळ संध्याकाळ असे दोन वेळा दूध संकलन करण्यात यावे अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

राशीन येथील श्री जगदंबा देवी देवस्थानची गट नंबर 1462 मधील मूळ खरेदी 41 गुंठे होती व त्याचे वाटप करताना मात्र अनाधिकाराने 65 गुंठे वाटप केलेले आहे. ते रद्द व्हावे. कर्जमाफीचे 2 लाख 75 हजार शासनाने परत स्विकारावी, अशा मागण्या करत नारायण जगताप यांनी याबाबत शासनाने योग्य प्रतिसाद न दिल्यास 26 मे 2022 पासून राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरा समोर आमरण उपोषण करणार असल्याचे मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com