भेसळीच्या पावडरसह 4 लाखांचा मुद्देमाल पकडला

भेसळीच्या पावडरसह  4 लाखांचा मुद्देमाल पकडला
Crime

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

दूध भेसळीसाठी (Adulterated Milk) घेऊन जात असलेली पावडरची गाडी कर्जत पोलिसांनी पकडली. यात चार लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करण्यात आला आहे. 13 जूनला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कर्जत पोलिसांना (Karjat Police) गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली, खेड गावच्या दिशेने एक स्विफ्ट कार येत असून त्यामध्ये दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडर असल्याचे सांगण्यात आले.

त्यानुसार पोलिसांनी खेड गावचे शिवारात एक स्विफ्ट कार थांबवून विचारपूस केली असता त्यात असिफ गफूर शेख (वय 22), अरबाज हसन शेख (वय 22 वर्षे), दोन्ही रा. मुसलमान वस्ती, दूरगाव, तालुका कर्जत असे असल्याचे सांगितले. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता त्यात दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडरच्या (Adulterated in milk powder) 25 किलो वजनाच्या 8 गोण्या व प्रत्येक गोणीची किंमत 3 हजार 500 रुपये प्रमाणे 28 हजार किमतीची पावडर आणि स्विफ्ट गाडी असा 4 लाख 28 हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com