दुधभेसळी विरोधात आजपासून धडक मोहिम

चार पथके करणार तपासणी
दुधभेसळी विरोधात आजपासून धडक मोहिम

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य सरकारच्या आदेशानूसार जिल्ह्यातील दूधातील भेसळ रोखण्यासाठी आजपासून 15 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात धडक तपासणी मोहिम राबवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांनी अन्न औषध विभागाचे सहायक आयुक्त यांना दिले आहेत.

या आदेशात अन्न औषध प्रशासन विभागाने स्वतंत्रपणे चार पथके तयार करून तालुकानिहाय आपल्या कार्यालयातील मनुष्यबळ आणि वाहनासह दुध संकलन केंद्र, दुध संकलन संस्था, प्रकल्प याठिकाणाहून दुधाचे नमुने घेवून त्याची तपासणी करून भेसळ करणार्‍या विरोधात कारवाई करण्यास सांगितले आहे. या तपासणी मोहिमेत सुरूवातीला मोठ्या संस्था आणि संकलन केंद्र आणि त्यानंतर छोटे संकलन केंद्र आणि प्रकल्प यांची तपासणी करण्यास सांगण्यात आले आहेत. त्यानूसार आजपासून जिल्ह्यातील दुध संकलन करणारे केंद्र, प्रकल्प आणि दूधाची विक्री होणार्‍या ठिकाणी तपासणी मोहिम सुरू होणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com